
राष्ट्रीय जिवन भरारी पुरस्काराने दत्ताभाऊ सिरसाट सन्मानित
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाह
वनीता फाऊडेशन मुंबई. नॅशनल टॅलेन्ट बुक ऑफ हुमन रेकार्ड. सम्यक वैद्यकिय व शिक्षण चारीटेबल ट्रस्ट मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने पच्छीम ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयातील भव्य रेगे सभागृहात आयोजीत राष्ट्रीय जिवन भरारी संमेलनात अखील भारतिय अंधश्रध्दा निर्मृलन समिती चे दक्षीण बुलडाणा जिल्हा संघटक दत्ताभाऊ सिरसाट यांना शेखर फडके तू ही रे मालीकेतील सुप्रशिद्ध अभिनेता . शिर्के दिग्दर्शक अभिनेता. प्रा डॉ बी एन खरात . यांचे हस्ते रेशमी शाल पांघरून बहुमोलाचा राष्ट्रीय जीवन भरारी पुरस्कार . मानचिन्ह सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला या राष्ट्रीय जीवन भरारी समेलनास उद्योजक मुरबाड दिनेश उघडे. जेष्ठ साहीत्यीक डॉ. भूपेंद्र संखे. राष्ट्रीय शौर्य पदक विजेते अग्नीशमन दलातील सेवानिवृत्त अधिकारी तुकाराम पाटील मुंबई यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या राष्ट्रीय जीवन भरारी . संमेलनात विदर्भ, मराठवाडा, कोकण विभागातून कला, संस्कृती, क्रिडा, साहीत्य, पर्यटन, वैघ्यकिय, प्रशासन, धार्मिक राजकिय व पुरोगामी समानसेवेची परंपरा जोपासण्याचे सक्रिय कार्य करणाऱ्या समाज सेवकांनाही मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
