
खोट्या पोलिसी तोतयागिरीने ढाब्यावर धाड तीन आरोपींवर गुन्हा दाखल
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मानेगाव फाट्यावर असलेल्या ‘मॉ पूर्णा माय ढाबा’वर पोलीस असल्याचे भासवून काही आरोपींनी धाड टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी सुनिल समाधान इंदोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अजयसिंग उर्फ सुरजसिंग प्रतापसिंग राजपूत, अक्षय प्रतापसिंग राजपूत आणि सचिन रामेश्वर कंठाळे या तिघांनी संगनमताने स्वतःला स्पेशल पथकाचे पोलीस असल्याचे खोटे भासवले. त्यांनी ढाब्यावर अवैध दारू विक्री होत असल्याचा बनाव करून झडती घेतली. ही संपूर्ण घटना तोतयागिरी व खोट्या बतावणीच्या माध्यमातून घडल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणात संबंधित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 204 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार अतुल मोहाळे करत आहेत.खोट्या पोलिसी तोतयागिरीमुळे ढाबा चालकावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला असून, पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अशी प्रकरणे वाढत असल्याने नागरिकांनी अशा बनावट टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
