
निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची संदेश यात्रा पालखी परत पोचली कर्ममूमित दहा संदेशांबरोबरच स्वच्छता , वृक्षारोपण , आरोग्य, पर्यावरणा संवर्धनाचा दिला संदश
प्रतीनीधी बाळासाहेब नेरकर मुर्तिजापुर
श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी म्हणून ओळख असलेल्या मुर्तिजापुर येथे गौरक्षणात दि. 26 जुन गुरुवारी गाडगेबाबा यांच्या समाधी स्मारकातून निघालेली श्रीसंत गाडगेबाबा संदेश पालखी यात्रा श्रीतिर्थक्षेत्र पंढरपूर येथे दोन आषाढी यात्रेत मुक्कामी राहून तसेच श्रीसंत गाडगेबाबा जिवन संदेश व विचारांचा प्रचार आणि पसार करीत विविध यशस्वी उपक्रम राबवित संदेश पालखी यात्रा परत पोहचली. अकोला, वाशीम, हि़गोली, परभणी, बिड , सोलापुर अशा जिल्ह्यांतील काटेपुर्णा अकोला, वाशीम, परभणी, परळी वेजनाथ अंबेजोगाई, बार्शी ईत्यादी ठिकाण च्या मुक्कामात ईतर पालख्यातील पारंपारिक हरिपाठ , भजन , किर्तन भारुळं सादरी करणाबरोबरच श्रीसंत गाडगेबाबा यांचे संदेशांचा प्रसार व प्रचार करीत प्रबोधनात्मक वेगवेगळे उपक्रम राबविले. स्व. वासुदेवबाबा यांच्या नेतृत्वात 67 वर्षा पुर्वी सुरवात करण्यात आलेली ही पालखी 20 वर्षापासून श्रीसंत गाडगेबाबा यांचे पणतू सतिष सोनोने यांच्या पुढाकारात … रमेशराव निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि राजू सोनोने, प्रकाश चौधरी, दिगांबर काळे, रवी पाटील महल्ले, सुखदेव ठाकरे , यांच्या व्यवस्थापणात प्राचारण करीत आहे. तर वृक्षारोपण , पर्यावरण निसर्ग संवर्धन आणि विविध प्रबोधनात्मक उमक्रमाबरोबच श्रीसंत गाडगेबाबा यांच्या दहा सुत्री कलमांच्या व विचाराचा प्रचार व प्रसाराचे काम वरील संमाननीय मान्यवर सबोत संत गाडगेबाबा कर्मभूमी प्रतिष्ठान , मुर्तिजापुर चे अध्यक्ष तथा स्मारक समितीचे सचिव अनिल डाहेलकर , ग्रामगिता प्रचारक मनोज राऊत (देशमुख) व ईतर यशस्वी पणे जवाबदारी घेवूत पार पाडले आहे.
