मलकापूरमध्ये ३८ लाख ८८ हजारांचे चंदन जप्त. नाकाबंदीदरम्यान पाठलाग करून पोलिसांची कारवाई

मलकापूरमध्ये ३८ लाख ८८ हजारांचे चंदन जप्त.
नाकाबंदीदरम्यान पाठलाग करून पोलिसांची कारवाई

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

चंदनाच्या लाकडांची तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून मलकापूर पोलिसांनी एकूण ३८ लाख ८८ हजार ९०० रुपयांचा माल जार केला. ही कारवाई आज, ७ जुलै रोजी सायंकाळी करण्यात आली.मोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या आदेशानुसार आज दुपारी ४ ते सायंकाळी ५ वाजतादरम्यान मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या हदीत बोदवड नाका नाकाबंदी करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत श्रीगारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शामानंद शिरसाट, दिलीप रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल कैलास सोनोने, आनंद माने,
ईश्वर बाब यांनी ही नाकाबंदी केली. सायंकाळी ५ वाजता फुलडाणा रोडकडून एक आयशर बाहन बेताना दिसले. त्याला पोलिसांनी धांवण्यास सांगितले,मात्र, चालकाने बाहन न थांचवता भरधाव वेगाने निघून गेला. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी आयकर बाहनाचा पाठलाग करुन तुलसी नगर भाग १ जवळ वाहन थांबवले यावेळी वाहन चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शेख जैनोददीन शेख अजिमोददीन (वय ४१, रा. सत्तामपुरा, नेकनूर, ता. जि. बीड) असल्याचे
सांगितले. वाहनातील मालासंबंधी विचारले असता त्याने उडवाउडवीचे उतर दिले. त्यामुळे संशय
आल्याने वाहनाची पोलिसांनी पाहणी केली. त्यावेळी वाहनामध्ये दोन कप्पे केलेले दिसले. पहिला कप्पा रिकामा, तर दुसऱ्या कप्प्यात खताच्या पिशव्यांमध्ये लाकडे भरलेली दिसली. चालकाला लाकडाबाबत विचारणा केली असता त्याने चंदनाची लाकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर वाहन पोलीस ठाण्यात आणून मोताळा येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती देऊन पोलीस ठाण्यात बोलावले. त्यांनी मलकापूर येथे येऊन वाहनाची पाहणी केली.
त्यावेळी प्लॉस्टीक पिशव्यामध्ये चंदन वृक्षाच्या खोडापासून तयार केलेले गाभा लाकूड दिसून आले. तसेच काही पोत्यांमध्ये गाभा लाकूड वेगळे
तयार करताना तयार होणारा भिलावा चिलटा असल्याचे दिसून आले. त्यानंतर सर्व मुददेनालाचे पोते वाहनातून खाली उतरविण्यात आले. पोत्यांमध्ये असलेला मुददेमाल चंदन वृक्षापासून तयार करण्यात आलेला असल्याची खात्री झाली.
या मालाचे मोजपाप केले असता एकूण चंदन लाकूड २७पोते त्यांचे एकूण वजन ६२९ किलो किंमत अंदाजे २२ लाख १ हजार ५०९ रुपये, तसेच चंदन लाकडाचा मिलावा चिलटा असलेले १५ पोते किंमत अंदाजे ८७ हजार ४०० रुपये व आयशर वाहन किंमत १६ लाख रुपये असा एकूण ३८ लाख ८८ हजार ९०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *