
राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार २०२५” ने नाणेतज्ज्ञ शेख दिलावर सन्मानित
तालुका प्रतिनिधी जावेद शाह
कोल्हापूर : चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील रहिवासी असलेले युवा इतिहास संशोधक, नाणेतज्ज्ञ शेख दिलावर यांना परिवर्तन फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने “राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार २०२५” बहाल करण्यात आला आहे.जिद्द आणि अपार कष्ट करण्याची तयारी असली की, यश हे निश्चितच प्राप्त होते.याचा प्रत्यय युवा इतिहास संशोधक तसेच नाणेतज्ज्ञ दिलावर शेख अय्युब यांना सामाजिक कार्य आणि ऐतिहासिक क्षेत्रात आतापर्यंत तीन राज्यस्तरीय आणि एक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे यावरून सिद्ध होते. अंत्री खेडेकर येथील तरुण तडफदार अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे.मोहम्मद पैगंबर, शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचाराचे पाईक असलेले दिलावर शेख व्यावसायिक असून ते सर्व कष्टाची कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.अत्यंत प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीवर मात देऊन शेख दिलावर यांनी हे यश संपादन करून समाजातील तरुणांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.परिवर्तन फाऊंडेशनच्या वतीने गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त “राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार २०२५” स्थळ राजर्षी शाहू महाराज स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे एका भव्य कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला . यावेळी कोल्हापुर जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, डॉ राजेंद्रसिंग वालिया , संतोष आठवले संस्थापक प्रमुख पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना, उमेश जामसंडेकर जेष्ट पत्रकार, जेष्ट विधिज्ञ धनंजय पठाडे बी न्युज चे ताज मुल्लाणी , शेतमुजरांचे नेते सुरेश सासणे कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अमोल कुरणे आदी मान्यवरांच्या हस्ते नाणेतज्ज्ञ शेख दिलावर यांना “राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार २०२५” देऊन सन्मानित करण्यात आले.मित्रपरिवार व समाज बांधवांकडून त्यांचे कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.*”राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार २०२५” ने नाणेतज्ज्ञ शेख दिलावर सन्मानित…* तालुका प्रतिनिधी जावेद शाहकोल्हापूर : चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील रहिवासी असलेले युवा इतिहास संशोधक, नाणेतज्ज्ञ शेख दिलावर यांना परिवर्तन फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने “राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार २०२५” बहाल करण्यात आला आहे.जिद्द आणि अपार कष्ट करण्याची तयारी असली की, यश हे निश्चितच प्राप्त होते.याचा प्रत्यय युवा इतिहास संशोधक तसेच नाणेतज्ज्ञ दिलावर शेख अय्युब यांना सामाजिक कार्य आणि ऐतिहासिक क्षेत्रात आतापर्यंत तीन राज्यस्तरीय आणि एक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे यावरून सिद्ध होते. अंत्री खेडेकर येथील तरुण तडफदार अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे.मोहम्मद पैगंबर, शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचाराचे पाईक असलेले दिलावर शेख व्यावसायिक असून ते सर्व कष्टाची कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.अत्यंत प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीवर मात देऊन शेख दिलावर यांनी हे यश संपादन करून समाजातील तरुणांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.परिवर्तन फाऊंडेशनच्या वतीने गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त “राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार २०२५” स्थळ राजर्षी शाहू महाराज स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे एका भव्य कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला . यावेळी कोल्हापुर जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, डॉ राजेंद्रसिंग वालिया , संतोष आठवले संस्थापक प्रमुख पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना, उमेश जामसंडेकर जेष्ट पत्रकार, जेष्ट विधिज्ञ धनंजय पठाडे बी न्युज चे ताज मुल्लाणी , शेतमुजरांचे नेते सुरेश सासणे कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अमोल कुरणे आदी मान्यवरांच्या हस्ते नाणेतज्ज्ञ शेख दिलावर यांना “राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार २०२५” देऊन सन्मानित करण्यात आले.मित्रपरिवार व समाज बांधवांकडून त्यांचे कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
