
तहसील कार्यालयात मुक्काम आंदोलन मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत तहसील कार्यालय सोडणार नाही : शेतकरी आंदोलक प्रकाश भिसे
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे जळगांव (जा) :- शेतकरी गेल्या मागील काही वर्षांपासून नैसर्गिक संकटाने त्रस्त झाला आहे शेतमालाच्या कोसळलेल्या बाजारभावांमुळे आधीच आपला बळीराजा त्रस्त झाला आहे. वर्तमान महायुती सरकार फक्त शेतकऱ्यांना आश्वासन देत आहे परंतु प्रत्यक्षात कुठलीही अंमलबजावणी होताना दिसत नाही हा एक प्रकारचा शेतकऱ्यांसोबत विश्वासघातच आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही आता शेतकऱ्याने लोकशाही मार्गाने शासनकर्त्यान विरोधान न्यायासाठी हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढावं लागणार आहे.म्हणून पीक विमा, पीक कर्ज, अतिवृष्टी अनुदान, घरकुल लाभार्थी, वीज ग्राहक यांच्या मागण्यां घेऊन आज जळगाव (जामोद) तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व येत्या 7 दिवसात आमच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या सोमवार दि 23 जून रोजी तहसील कार्यालयात “मुक्काम आंदोलन” करू असा इशारा भूमिपुत्रांनी दिला आहे. शेतकरी हिताच्या व हक्काच्या एकूण 6 मागण्या घेऊन मुक्काम आंदोलन करणार आहोत.प्रमुख मागण्या -1) जळगांव (जामोद) तालुक्यातील 2024, खरीप, हंगामातील व फळबागांचा बाकी असलेला पीक विमा द्या.2) मागील वर्षीच्या अतिवृष्टी जुलै ते सप्टेंबर 2024 मधील हे.13600 रु अनुदान kyc केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ टाका.!3) पिक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी पुन्हा पीक कर्ज द्यावे.4) म.रा.विद्युत वितरण कंपनीने ग्रामीण भागात सक्तीने स्मार्ट प्रीपेड मीटर बसवने सुरू आहे ते तत्काळ थांबवावे.5) खांडवी येथे मंजूर झालेल्या म.रा.विद्युत वितरण कंपनी उपकेंद्राचे काम तात्काळ सुरू करा.6) महसूल मंत्र्यांच्या निर्देशानुसार गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करावी व लाभार्थ्यांना वाळू वितरित करा.वरील मागण्या घेऊन जळगांव (जामोद) तालुक्यातील शेतकरी भूमिपुत्र दिनांक 23जून रोजी तहसील कार्यालयात आंदोलनाला बसले आहे. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तहसील कार्यालय सोडणार नाही असा पवित्रा शेतकरी आंदोलक प्रकाश भिसे यांनी घेतला आहे.या आंदोलनात युवा आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे, तुकाराम पाटील गटमने, अशपाक भाई देशमुख, कार्तिक भाऊ राऊत, कॉ रामेश्वर काळे, संकेत राहाटे. अजय गिरी दिलीप मानसुटे, प्रवीण चिपडे, पुंडलिक वाघ, बळीराम बोरे, पवन वाघ, संतोष गनगे, सुनिल ढोले, गणेश भगत, गोपाल उमरकर निखिल टापरे आदी शेतकरी उपस्थित होते.
