हिंदी विषय सक्तीचा घाट घालू नयेः मनसेचे निवेदन

हिंदी विषय सक्तीचा घाट घालू नयेः मनसेचे निवेदन

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

राज्यात महायुती शासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला असून त्याअनुषंगाने आज २१ जून रोजी मलकापूर तालुका व शहर मनसेच्या वतीने तालुक्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना हिंदी सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येवू नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, देशातील कोणत्याही राज्यामध्ये शैक्षणिक पातळीवर हिंदी विषयाची सक्ती करण्यात आलेली नसतांना केवळ महाराष्ट्रातच हिंदी विषयाच्यासक्तीचा घाट घालण्यात आलेला आहे. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे, त्यामुळे हिंदी विषयाची सक्ती हा एकप्रकारे मराठी भाषेला दाबण्याचा प्रयत्न केल्यासारखे आहे. हिंदी विषय हा ऐच्छिक असणे याला विरोध नाही मात्र हिंदी विषयाची सक्ती करणे हा एक प्रकारे विद्यार्थ्यांवर व मराठी भाषेवर अन्यायकराक प्रकारच महाराष्ट्र राज्यात राज्य शासनाच्या वतीने चालविला आहे. या विरोधात मनसे प्रमुख राजसाहेबठाकरे यांनी कडकडून विरोध केलेला असून याच अनुषंगाने आज मलकापूर तालुक्यातील सर्व शाळा, विद्यालयांच्या मुख्याध्यापकांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना हिंदी विषय सक्तीबाबत विरोध दर्शविण्यात आला.यावेळी मनसे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, गणेश जैस्वाल, दुर्गेश ढोलकर, निखील पोंदे, दिपक जाधव, नितीन कदम यांचेसह मनसे सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *