
मराठा सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर : एक विद्यार्थी घडला व तो जर नोकरीवर किंवा अधिकारी पदावर विराजमान झाला तर तो त्याच्या तिन पिढ्यातील विद्यार्थी घडवू शकतो. यामुळे पालकांनो विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे ते क्षेत्र निवडण्याची त्यांना मोकळीक द्या. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडून यश संपादन करत आई-वडिलांचे नाव उंचवावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.बुलढाणा अनिल अकाळ यांनी केले.आज २१ जून रोजी मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हा सचिव इंजि.सचिन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वधर्मिय

गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन छत्रपती शिवराय मराठा मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून अनिल आकाळ तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामीण पो.स्टे.चे ठाणेदार संदीप काळे हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजि.विजयकुमार ठुबे हे होते. तर प्रमुख उपस्थितीत कृउबासचे सभापती संजय काजळे, भाराकाँ नेते अॅड.साहेबराव मोरे, राकाँ नेते संतोषराव रायपुरे, कृउबास संचालक साहेबराव पाटील, सुभाष पाटील, प्रविण क्षिरसागर, विजय साठे, केदार एकडे, ज्ञा ना हिवाळे सर,बी.सी.महाजन, संजय पाटील मुक्ताईनगर प्रसादराव जाधव, बाळूभाऊ पाटील, राजू साठे, राजू पाटील, राजेंद्र वाडेकर, शंकरराव पाटील, संजय गावंडे सर, दिपक चांभारे, जयदीप पाटील, साहेबराव जगताप, हरीभाऊ पाटील सर, राजूभाऊ गावंडे, मोहनराव पाटील, सोनोने साहेब, गटशिक्षणाधिकारी एन.जे. फाळके,एन. बी. शिंदे शिक्षण विस्तार अधिकारी, पत्रकार हनुमान जगताप, अमर पाटील,सुधाकर भाऊ, लक्ष्मणराव घनोकार, प्रा.अमोल पाटील, प्रा.किशोर मोरे, दिलीप अढाव सर, धनंजय

संबारे(ऑस्ट्रेलीया),भगवान सोईस्कर,अजाबराव धोरण, प्रमोद सोनोने, सोपान भाऊ शेलकर, ज्ञानदेव ढगे, संभाजी शिर्के, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक मनिष मानकर, अमर पाटील, इंजि.सौ. कोमलताई सचिन तायडे, ह भ प महादेव महाराज खोडके,ह.भ.प.नितीन महाराज, वनिताताई गायकवाड, शिलाताई संबारे, आश्विनीताई देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हा सचिव इंजि. सचिन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली १० वी ८५ टक्केचे वर व १२ वी मध्ये ८० टक्केच्या वर गुण प्राप्त करणार्या, स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्वधर्मिय विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. एनएमएमएसच्या विद्यार्थ्यांचा, नीट परीक्षतील गुणवंतांचा, क्रीडा क्षेत्रातील प्राविण्यप्राप्त, अधिकारी नियुक्त, पीएचडी पदवीप्राप्त, वैद्यकीय पदवी प्राप्तांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला मलकापूर शहर व ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने गुणवंत विद्यार्थ्यांनी, पालकांनी अभूतपुर्व अशी हजेरी लागल्याने छत्रपती शिवराय मंगल कार्यालयाचा सभागृहही कमी पडला होता.तर अॅड.साहेबराव मोरे यांनी आयोजकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाची शिकवण घेत या सोहळ्याला सर्वधर्माचे स्वरूप दिल्याने त्यांचे आभार व्यक्त केले.तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक मनिष मानकर यांनी विद्यार्थ्यांनी केवळ इंजिनिअर व वैद्यकीय शिक्षण याकडेच न वळता अनेक नोकरीच्या संधी असणार्या शिक्षणाकडे वळावे, याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देत मार्गदर्शनासाठी आपण सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली. तर विजयकुमार ठुबे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपल्या परिवाराला संपुर्णत: यशस्वी करण्यासाठी कसोसिने प्रयत्न करत उच्च शिक्षण घेवून अधिकारी पदापर्यंत मजल मारावी असे आवाहन करीत अशा प्रकारचे सोहळे आयोजित करून आयोजकांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे मनोबल वाढविल्याबद्दल त्यांचे आभार मानले.तर प्रास्ताविकात मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव इंजि.सचिन तायडे यांनी आयोजनाबद्दल माहिती देत विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी दिवस-रात्र एक करून मेहनत घ्यावी लागते. अशा मेहनती विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहणार्या पालकांचे कोठेतरी कौतुक होणे गरजेचे असते. यामुळेच आपण या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करीत असल्याचे सांगत या यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरवा पासून प्रेरणा घेत भविष्यात विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्यास तेच आमच्या कार्यक्रमाची खरी पावती ठरेल, असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन मराठा सेवा संघाचे मलकापूर तालुकाध्यक्ष रविभाऊ खराटे सर, संजय रहाटे यांनी तर आभार प्रदर्शन विष्णू म्हैसागर यांनी केले. यावेळी जिजाऊ वंदना वेदांगी पाटील, जिजाऊ ढगे यांनी म्हटली. तर मंचकावर स्वयंसेवक म्हणून यांचेसह योगेश येरळीकर, शिवराज वनारे, अथर्व संबारे, अद्विका रहाटे, समीक्षा रहाटे, हर्षदा म्हैसागर आदींनी योगदान दिले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कैलासराव तायडे, , संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, एस.पी.संबारे सर,दिलीप अढाव सर, विष्णू म्हैसागर, उल्हासराव संबारे, पुरूषोत्तम वनारे, नवल तायडे, संभाजीराव गायकवाड, मंगेश धोरण, शिवाजी देशमुख, विजय गायकवाड, निलेश आसटकर, अमोल देशमुख सर, अॅड.निलेश तायडे, शिवाजी देशमुख, किरण अहिरे साहेब, चंद्रशेखर तायडे, विवेक तायडे, जुनारे सर, गोपाळ रायपुरे, अजय तायडे, रविंद्र भोलणकर, रोशन पाटील,अण्णा गायकवाड, प्रमोद क्षिरसागर, राहुल संबारे, सुनिल संबारे, दिलीप कोल्हे, संजय खोडके, सुयोग गावंडे, चेतन खोडके, डॉ.चेतन जाधव, अॅड.जी.डी.पाटील, मनोज घोंगटे,अशोक मराठे, संजय सावळे सर, सी आर पाटील सर, प्रकाश खराटे सर,योगेश येरळीकर, संदीप बोंडे, सुरळकर सर, प्रशांत अढाव, दिलीप देशमुख, विशाल पाटील, मुकेश जगताप, संभाजी गायकवाड, उल्हास धोरण, पंकज जंगले, गजानन तायडे,विष्णू भाऊ पाटील, नारायण बाठे ,पिंटू पारस्कर, गजानन काकर, पत्रकार नितीन पवार, सिध्देश देशमुख, विजय अढाव, अक्षय जुनारे, निखिल कोकाटे, गणेश शिंदे, गजानन अढाव, श्रीकृष्ण अढाव, रवि लांडे, विवेक तायडे, गजानन काकर, गजानन संबारे, संदीप सारोकार, राहुल वनारे, शुभम काजळे, शुभम लाहुडकर, श्रीकृष्ण क्षिरसागर, इच्छाराम संबारे, विष्णू संबारे यांचेसह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व आयोजन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव इंजि.सचिन तायडे यांनी विद्यार्थी १० वी व १२ वी मध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होतात. त्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा कोठेतरी सन्मान व्हावा व या होत असलेल्या सन्मानामुळे व याठिकाणी मिळत असलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी प्रेरीत होत जिद्दीने उच्च शिक्षणात यश संपादन करावे या हेतूने आम्ही सदर कार्यक्रम आयोजित करीत असल्याचे त्यांनी सांगून कुठल्याही विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी अडीअडचण आल्यास मराठा सेवा संघ सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील अशी ग्वाही दिली.
