
जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
प्रतिनिधी जळगाव जामोद
‘योग अभ्यासातून मिळाली आरोग्यदायी ऊर्जा’जळगाव जामोद, 21 जून 2025:आज संपूर्ण देशभर आणि जगभर साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस जळगाव जामोद येथील पोलीस स्टेशनमध्ये विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे नेतृत्व आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक प्रसेनजित मिश्रा यांनी केले.या कार्यक्रमात विविध योग अभ्यास प्रकारांचा समावेश होता – वॉर्मअप, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान, आणि श्वसनासंबंधित क्रिया.प्रसेनजित मिश्रा यांनी सर्व उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हे योग अभ्यास प्रत्यक्ष करून दाखवले आणि त्यांच्या जीवनात यांचे महत्त्व पटवून दिले.त्यांनी सांगितले, “आपण नियमित योग अभ्यास केल्यास केवळ शरीर नव्हे तर मनही संतुलित, निरोगी आणि आनंदी राहते.”या उपक्रमात तुळशीराम राठोड सर हे त्यांचे सहकारी म्हणून सहभागी झाले होते.ठाणेदार श्रीकांत निचळ साहेब यांनी देखील सहभाग घेत योगाभ्यासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “प्राणायाम आणि ध्यान केल्यानंतर मला आतून शांतता आणि सकारात्मकता जाणवली. पोलीस खात्याच्या धकाधकीच्या जीवनात ही ऊर्जा फार आवश्यक आहे.”या उपक्रमात सहभागी झालेले अधिकारी व कर्मचारी पुढीलप्रमाणे:पीएसआय नारायण सरकटेपीएसआय नागेश खाडेपीएसआय अमोल पंडितपीएसआय झेडगेनिलेश पुंडे, सचिन राजपूत, सुपेश तायडे, मंगेश सोळंके, अर्चना पाचपोरव आरसीबी पथकातील कर्मचारीसर्वांनी एकमुखाने ठरवले की, आपल्या दैनंदिन जीवनात योग अभ्यासाचा समावेश करून आरोग्य, मनशांती आणि तणावमुक्तता याची दिशा आपण घेणार आहोत.प्रसेनजित मिश्रा यांचे आणि जळगाव जामोद पोलीस प्रशासनाचे या उपक्रमासाठी विशेष कौतुक करण्यात येत आहे.
