
कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केले माती परिक्षण
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे
जळगाव जा. स्वा. वि.ग.ई. कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रातील विद्यार्थी यांनी 18 जून रोजी त्यांच्या कृषी कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे किती दिवस वडशिंगी परसरामपूर येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधून माती परिक्षणा विषयी चर्चा केली. व त्यांच्या जमीनीतील मातीचे नमुने घेतले. माती परिक्षणामुळे खताची मात्रा ठरवता येते. मातीतील घटकांची कमतरता माहिती होते. त्या नुसार मातीतील पोषद्रव्येची उपाय योजना करता येते. तेथील शेतकरी सुरेश कोकाटे, मंगेश गावंडे, रमेश भटकर व गावातील उपस्थित शेतकरी यांनी त्यांना सहकार्य केले. तसेच गावातील संरपंच शीतल वानखेडे यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच माती परिक्षणासाठी विद्यार्थिनी स्नेहा इंगळे, संगीता मिसाळ ,खुशी गौर ,प्रियंका दाभाडे ,विशाखा बोरसे ,निकिता खांबलकर ,ममता घुले, प्रणाली इंगळे ,मेघा थारकर ,व अपूर्वा बोडखे यांनी कार्यक्रम पार पाडला. तसेच कृषी महाविद्यालयाचे प्रा. योगेश गवई सर, कार्यक्रमाचे अधिकारी अविनाश आटोले सर, व समन्वयक प्रमोद ढवळे सर, तसेच विषय तज्ञ समाधान काळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
