
झुंझार आक्रमक युवानेते शेख रफिक शे. करीम यांचा शिंदे शिवसेना गटातून उ.बा.ठा. शिवसेना पक्षामध्ये दमदार प्रवेश
अमिन शेख सहसंम्पादक बुलडाणा
04 जुन, 2025 रोजी बुलडाणा शहरातील चळवळतील एक मोठे कार्यकर्ते शेख रफीक शेख करिम यांनी अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग घेवून स्वतःचे अंगावर घासलेट, डिझेल घेवून स्वतःच्या जीवाची व कुटूंबाची कोणतीही पर्वा न करता, कष्टकरी, भूमीहीन, सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जीवाची बाजी लावून न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे आणि आपला आक्रमक पावित्रा ऐनवेळी दाखविणारे झुंझार तरुण तडफदार शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते रफिक शे. करीम यांनी अखेरचा शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला.त्यांनी दि.02/06/2025 रोजी रायगड निवास चिखली येथे जिल्हा संपर्क प्रमुख व बुलडाणा लोकसभेचे उमेदवार प्रा.श्री. नरेंद्र खेडकर यांचे निवासस्थानी उ.बा.ठा. शिवसेना पक्षामध्ये शेख रफीक शेख करीम यांनी जाहीर प्रवेश घेतला. यावेळी बुलडाणा जिल्हा उ.बा.ठा.शिवसेना पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मोहम्मद सौफीयान अब्दूल रब्बानी, उ.बा.ठा.शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. विजयाताई खडसन, सौ. आरतीताई देशमुख महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख, महिला आघाडी तालुका प्रमुख लोणार सौ. तारामती जायभाये, प्रसिध्दी प्रमुख बंटीभाऊ कपूर, पत्रकार, कमलाकर जी. खेडेकर, सतिश देशमुख, मुजफ्फर सर व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.तनंतर उ.बा.ठा. शिवसेना जिल्हा प्रमुख जालींधरभाऊ बुधवत यांनी शाल, श्रीफळ देवून शे. रफिक यांचा जनशिक्षण संस्था बुलडाणा येथे जंगी सत्कार केला. यावेळी जालींधर बुधवत बोलतांना म्हणाले की, शे. रफिक यांच्या प्रवेशाने उ.बा. ठा. शिवसेना गटाला एक प्रकारे बळ मिळेल, यात तिळमात्र शंका नाही, कारण त्यांचा अगोदरची कारकीर्द ही जनमाणसात रुढ झाली असून सर्वसामान्यांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे उ.बा. ठा.शिवसेना गटाला एक चांगला कार्यकर्ता लाभला. यावेळी बुलडाणा तालुका प्रमुख लखन गाडेकर, किसान आघाडी तालुका प्रमुख गजानन उबरहंडे, अनिकेत गवळी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
