छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न.

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले त्याच अनुषंगाने पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी -२ देवधाबा येथे डॉ. गिरीश पंचभाई माफसु नागपुर येथील शास्त्रज्ञ यांचे चमुच्या भेटीचे औचित्य साधुन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देवकुमार सोळंके यांच्या अध्यक्ष ते खाली पार पडले. हा कार्यक्रम प्रशासन यांच्या वतीने पार पाडला यात सर्व विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते, सर्वानी योजने बद्दल माहिती सांगितली, पशु संवर्धन विभागाच्या वतीने डॉ गिरीश माफसु शास्त्रज्ञ नागपुर व श्री आर. एच. फोफसे यांच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले. डॉ, गिरीश यानी, एन, एल, एम, योजना, व जनावरांच्या जाती, आरोग्य, आहार, व्यवस्थापन, वैरण, याबाबतील सखोल पशुपालकांना मोलांचे मार्गदर्शन करण्यात आले, तर आर, एच, फोपसे यांनी, जनावरांना नियमित जंतनाशक देऊन लसिकरण करावे, यांचे फायदे तोटे सांगितले, पशु संवर्धन विभागाचा आत्मा म्हणुन ओळखला जाणारा घटक म्हणजे कृत्रिम रेतन, या बाबतीत सखोल मार्गदर्शन करुन, विशेष घटक योजना, नाविण्यपुर्ण योजना, जिल्हा वार्षिक योजना, कुक्कुट योजना यांची माहिती देण्यात आली, या अभियान शिबीरात विभागीय अधिकारी मां. संतोष शिंदे, तहसिलदार श्री राहुल तायड़े, गटविकास अधिकारी व्ही. व्ही. सजगाणे. तालुका कृर्षी अधिकारी श्री ललित सुर्यवंशी प्रामुख्खाने उपस्थित होते. कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन श्री आर. एच. फोपसे पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ देवधाबा यांनी केले. व अभियान शिबीर यशस्वी रित्या पार पाडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *