पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त पशुवैद्यकीय तपासणी शिबिर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त पशुवैद्यकीय तपासणी शिबिर

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ देवधाबा येथे वंदत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले. दरम्यान १५ गाई व ५ म्हशींची गर्भ तपासणी करण्यात आली. यावेळी वृक्षरोपण कार्यक्रम घेण्यात आला.
प्रारंभी पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पशुधन पर्यवेक्षक आर. एच. फोपसे यांचे हस्ते करण्यात आले. पशुवैद्यकीय दवाखाना येथे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दवाखाना स्वच्छता मोहीम, वंदत्व निवारण शिबिर, मेंढपाळांच्या शेळ्या मेंढ्यांचे मान्सूनपूर्व लसीकरण, जंत निर्मूलन गोचीड निर्मूलन, करडे कोकरे मरतुक कमी करणे बाबत उपाययोजना आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे मेंढपाळांना मोलाचे मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले. तांत्रिक मार्गदर्शन व परिसंवाद साधुन विविध उपक्रम यशस्वी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *