
आज 29 रोजी मलकापुर न प विरूद्ध गाढव मोर्चा पक्ष नेते सर्वश्री मा आ राजेशजी एकडे, डॉ अरविंदजी कोलते, ॲड साहेबरावजी मोरे यांनी दिलेल्या सुचने नुसार, जेष्ठनेते तथा माजी नगराध्यक्ष सर्वश्री हाजी रशीदखा जमादार, श्यामभाऊ राठी, हरीशभाऊ रावळ तथा शहराध्यक्ष राजूभाऊ पाटील यांचे नेतृत्वात
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
न.प. प्रशासनाच्या कामचुकार, बेलगाम, भ्रष्ट कारभारामुळे मलकापूर शहरातील नाल्या अनेक दिवसांपासून स्वच्छ होत नाहीत, दररोज रस्त्यांची स्वच्छता होत नाही, नित्य कचरा संकलन होत नाही, पूर्णा मायला मुबलक पाणी असून सुद्धा १५ दिवसांत पाणीपुरवठा होत नाही, पाणी पुरवठा लिकेज दुरुस्त होत नाही, रस्त्यावरील पथदिवे बंद असतात, हायमास्ट लाईट्स बंद असतात अश्या मलकापूर नगर पालिकेच्या या सर्व विभागांच्या अनागोदी, कामचुकार व भ्रष्ट कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला समस्या आणि अडचणींना तोंड द्यावे लागत आहे,येत्या काही दिवसांत पावसाळ्या मुळे सामान्य जनतेला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे**या सर्व समस्यां बाबत न प प्रशासनाला विस दिवसां पूर्वी (दिनांक ६ में रोजी) निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाची कुंभकर्णी झोप उडाली नसल्याने* *गुरुवार दिनांक २९ मे रोजी दुपारी १२ वाजता श्री हुतात्मा स्मारक ते नगर परिषद कार्यलया पर्यंत गाढव मोर्च काढून न प येथे कचरा फेका व मडके फोडा आंदोलन करण्यात आले, सदर मोर्च्योत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे कार्यकर्ता तथा नगर वासीयांनी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते**न प हाय हाय, भाजपा सरकारचा निषेध असो, मुख्याधिकारी, प्रशासक मुर्दाबाद चे नारे देत मोर्चा न प कार्यालयावर पोहचल्या नंतर तेथे मडके फोडण्यात आले तथा कचरा फेकण्यात येऊन शहर अध्यक्ष राजू पाटील जेष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष हाजी राशिदखा जमादार, आंदोलन सम्राट अड हरीश रावल, सुहास (बंडू) चवरे, अल्पसंख्यक जिला अध्यक्ष ॲड जावेद कुरैशी, ॲड मजीद कुरैशी या सर्वांनी आपल्या वक्तव्यातुन न प प्रशासक, मुख्याधिकारी यांना जाब विचारत येत्या काळात पाणी प्रखठा व्यवस्था, लिकेज दुरुस्ती, कचरा संकलन, नाली साफ सफाई, रस्ते परिसर साफ सफाई, पथ दिवा इत्यादि व्यवस्था व्यवस्थित न केल्यास मुख्याधिकारी, प्रशासक यांचे तोंडाला काले फांसुन त्यांची गाढवा वरून धिंड काढण्यात येईल अशी तंबी दिली…**विशेष – पुढे डफडे वाजवत मागे मागे गळ्यात पाटी व सजविलेले दोन गाठव ज्यावर भाजपा सरकार, प्रशासक, मुख्याधिकारी न प मलकापूर लीहीलेले आकर्षन करून लोकांचे लक्ष वेधुन घेत होते….*
