
२८ मे ला खामगाव येथे दिव्यांग साहित्य तपासणी शिबिर दिव्यांगांनी सहभाग नोंदवावा भाजपा दिव्यांग सेल च्या वतीने आवाहन
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे
भारत सरकारचा दिव्यांग सशक्तीकरण आणि सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार व भारतीय कृत्रीम अंग निर्माण संस्था एलिम्को यांच्या वतीनेदिव्यांग घटकाला तसेच ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांना सामाजिक प्रवाहात आणण्याकरता विविध उपयुक्त साधनांच शिबिर आयोजित करण्यात आले आहेतरी या तपासणी शिबिराकरता दिव्यांगासह ज्येष्ठ नागरिक यांनी लाभ घ्यावा असे भाजपा दिव्यांग असेल च्या वतीने चंद्रकांत शिंदे यांनी केले आहेपंचायत समिती जळगाव जामोद येथे दिनांक 30 मे ला आहेअल्प उत्पन्न गटातील दिव्यांगाना मोफत साहित्यासाठी तपासणी शिबीर भारत सरकारचा दिव्यांग सशक्तीकरण आणि सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार व भारतीय कृत्रीम अंग निर्माण संस्था एलिम्को यांच्या वतीने निवासी मुक बधिर विदयालय खामगाव येथे बुधवार २८ मे रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत परिसरातील दिव्यांग व जेष्ठ नागरिक यांना मोफत साहित्य वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे.या शिबीरात तपासणी नंतर गरजु व आवश्यक रूग्णांना साहित्य वाटप केले जाणार आहे. या शिबीराचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगाजवळ अपंगत्व दर्शवणारा फोटो, आधार कार्ड युडीआयडी कार्ड २३ हजारापेक्षा कमी उत्पन्नााचा दाखला रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. एडीआयपी या योजने अतर्गत तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, बॅटरीवर चालणारी मोटारइज्ड, तीन चाकी सायकल, कुबडया, वॉकींग स्टिक, सिपी चेअर, बीटीई श्रवणयंत्र ब्रेलकेन, ब्रेलस्लेट, ब्रेलकिट, सुगम्यकेन, स्मार्टफोन, कृत्रिम अवयव कॅलीपर, इत्यादी साहित्य मिळणार आहे. तसेच आरव्हीआय योजने अतर्गत जेष्ठ नागरिकांना व्हीलचेअर कमोडसह व्हीलचेअर, कमोड खुर्ची, कुबडया, चालण्यासाठी काठी, ट्रायपॉड, ट्रायपॉड, चष्मा श्रवणयंत्र, ग्रीवा कॉलर, गुडघा ब्रेसडेंचर, एलबेल्ट इत्यादी साहित्य तपासणी करून मिळेल. त्यासाठी आधारकार्ड उत्पन्नाचा दाखला व फोटो इत्यादी सोबत आणणे आवश्यक आहे. हे शिबीर दिव्यांग व जेष्ठ नागरीकासांठी महत्वाचे असुन या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपा दिव्यांग सेल चे चंद्रकांत शिंदे यांनी केले आहे
