उदया 29 रोजी मलकापुर न प विरूद्ध गाढव मोर्चा

उदया 29 रोजी मलकापुर न प विरूद्ध गाढव मोर्चा

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

पक्ष नेते सर्वश्री मा आ राजेशजी एकडे, डॉ अरविंदजी कोलते, ॲड साहेबरावजी मोरे यांनी दिलेल्या सुचने नुसार, जेष्ठनेते तथा माजी नगराध्यक्ष सर्वश्री हाजी रशीदखा जमादार, श्यामभाऊ राठी, हरीशभाऊ रावळ तथा शहराध्यक्ष राजूभाऊ पाटील यांचे नेतृत्वात
न.प. प्रशासनाच्या कामचुकार, बेलगाम, भ्रष्ट कारभारामुळे मलकापूर शहरातील नाल्या अनेक दिवसांपासून स्वच्छ होत नाहीत, दररोज रस्त्यांची स्वच्छता होत नाही, नित्य कचरा संकलन होत नाही, पूर्णा मायला मुबलक पाणी असून सुद्धा १५ दिवसांत पाणीपुरवठा होत नाही, पाणी पुरवठा लिकेज दुरुस्त होत नाही, रस्त्यावरील पथदिवे बंद असतात, हायमास्ट लाईट्स बंद असतात अश्या मलकापूर नगर पालिकेच्या या सर्व विभागांच्या अनागोदी, कामचुकार व भ्रष्ट कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला समस्या आणि अडचणींना तोंड द्यावे लागत आहे,येत्या काही दिवसांत पावसाळ्या मुळे सामान्य जनतेला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे
या सर्व समस्यां बाबत न प प्रशासनाला विस दिवसां पूर्वी (दिनांक ६ में रोजी) निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाची कुंभकर्णी झोप उडाली नसल्याने
गुरुवार दिनांक २९ मे रोजी दुपारी १२ वाजता श्री हुतात्मा स्मारक ते नगर परिषद कार्यलया पर्यंत गाढव मोर्च काढून न प येथे कचरा फेका व मडके फोडा आंदोलन करण्यात येणार आहे तरी सदर मोर्च्योत नगर वासीयांनी जास्तित जास्त संख्येत सहभागी होण्याचे आव्हान भारतीय राष्ट्रीय कांग्रेस मलकापुर शहराचे वतीने करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *