फॉर्च्यूनरमध्ये सापडली ५० लाखांची रोकड !मलकापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई रक्कम आयकरच्या ताब्यात

फॉर्च्यूनरमध्ये सापडली ५० लाखांची रोकड !मलकापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई : रक्कम आयकरच्या ताब्यात

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

संशयावरून एका फॉर्च्यूनर वाहनाची तपासणी केली असता मलकापूर ग्रामीण पोलिसांना तब्बल ५० लाख रुपयांची रोकड आढळून आली. वाहनासह ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील कार्यवाहीस्तव आयकर विभागाकडे रक्कम सोपविल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.२० मे रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास खामगावकडून एका फॉर्च्यूनर वाहनातून अवैधरीत्या पैशांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्गावरील विटाळी-धानोरा शिवारातील पुलावर एमएच-२१-बीवाय ०१०१ या पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीला थांबविण्यात आले. पंचांसमक्ष झडती घेतली असता या गाडीत ५० लाख रुपये आढळले. पंचनामा करून रक्कम जप्त करण्यात आली. ही रक्कम खामगावच्या आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप काळे, पीएसआय प्रशांत राठोड, एएसआय उल्हास मुके, हेड कॉन्स्टेबल रविकांत बावस्कर, दीपक नाफडे, संदीप राखोंडे व कऱ्हाडे यांनी ही कारवाई केल्याचे समजते. फॉर्च्यूनर गाडीत खामगाववरून पैसे कोणाकडून घेतले गेले? एवढी मोठी रोख रक्कम कुठे नेण्यात येत होती? वाहन कोणाच्या मालकीचे आहे ? या पैशांचा वापर कशासाठी होणार होता? असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असतानाच विविध तर्कवितर्काच्या चर्चानाही उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *