दिव्यांग व जेष्ठ नागरीकांना मोफत साहित्य वाटपकरीता तपासणी शिबिर

दिव्यांग व जेष्ठ नागरीकांना मोफत साहित्य वाटपकरीता तपासणी शिबिर

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर स्थानिक मलकापूर येथे श्री जैन महिला मंडळ द्वारा संचालित भगवान महावीर निवासी मुकबधीर विद्यालय मलकापूर व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर यांचे संयुक्त विद्यमाने दिव्यांग व जेष्ठ नागरीकांना मोफत सहाय साहित्य वाटप शिबिराचे आयोजन दि. २६.०५.२०२५ रोजी मुकबधीर विद्यालयाच्या वसतीगृहाच्या प्रांगणात सकाळी ११ वाजतापासून दूपारी ५ वाजेपर्यंत आयोजीत करण्यात आले आहे. सदर शिबीरामध्ये अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेबल पाल्सी, कर्णबधीर तसेच पूर्णतः अंध दिव्यांग व्यक्तीसाठी आवश्यक असणा-या सहायक साहित्याचे निश्चिती करणेसाठी तपासणी करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभाग व सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालययांचे वतीने एडीप व आर व्ही वाय अंतर्गतसदर साहित्य वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी दिव्यांगांची तपासणी होणे अनिवार्य असल्यामुळे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळणेसाठी दिव्यांगांनीअपंगत्व दर्शविणारे एक फोटो, आधार कार्ड, युडीआय डी कार्ड किंवा अपंगत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला रू २२,५०० पेक्षा कमी मासिक उत्पन्न असणारा, तसेच राशन कार्ड सोबत आणावे. तसेच जेष्ठ नागरीकांसाठी एक फोटो, आधारकार्ड, १५००० रू पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला सोबत आणणे आवश्यक आहे. वरील योजनेअंतर्गत ३ पूर्वी लाभ घेतला असल्यास ती व्यक्ती पात्र ठरणार आहें.एडीप स्कीम अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकल, व्हिल चेअर, बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल, कुबड्या, वॉकींग स्टिक, सीपी चेअर, बिटीई श्रवणयंत्र, ब्रेल साहित्य, कृत्रिम अवयव, कॅलीपर इत्यादी साहित्य देण्यात येणार असून जेष्ठ नागरीकांना व्हिल चेअर, कमोडसह व्हिल चेअर, काठी, पॉडसाहित्य, श्रवणयंत्र, ग्रीवा कॉलर, गुडघा ब्रेस व इतर सहायक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. उत्पन्नाचा दाखला सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, नगराध्यक्ष यांचा ग्राहय धरण्यात येणार आहे. तरी मलकापूर परिसरातील दिव्यांग तथा जेष्ठ नागरीकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *