
शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करावा मा.अनिसा महाबळे प्रकल्प संचालीका आत्मा
वाशिम तालुका प्रतिनिधी संजय भरदुक मंपिर
दिनांक 13 मे 2025दिनांक 14 मे 2025 वेळ दुपारी 2: 45 मि. स्थळ:- कारंजा नैसर्गिक शेती मिशन प्रशासकीय कार्यालय विळेगाव महाराष्ट्र शासन कृषी विभाग परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत कारंजा तालुक्यामध्ये 25 शेतकरी बचत गटानी एकत्र येऊन कारंजा नैसर्गिक शेती मिशन फॉर्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केलेली आहे सदर कंपनीच्या खरीप हंगाम आढावा बैठक 2025 बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा वाशिम च्या प्रकल्प संचालिका मा. अनिसा महाबळे मॅडम यावेळी मार्गदर्शनार्थ बोलत होत्या शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करावा व सोयाबीन पिकाला पर्याय पीक म्हणून पारंपरिक उडीद पीक , मूंग पिक ,हळद पीक ,तीळ पीक अशा पारंपारिक पिकाची पेरणी करावी तसेच अक्कलकाळा ,पांढरी मुसळी ,अश्वगंधा औषधी वनस्पतीची सुद्धा शेतकऱ्यांनी पेरणी करावी तसेच हंगाम सुरू होण्यास करिता सध्या वेळ आहे. करिता शेतकऱ्यांनी येणाऱ्या हंगामाकरिता लागणारे नैसर्गिक निविष्ठा यामध्ये दशपर्णी अर्क ,जीवामृत , बायोडायनामिक कंपोस्ट गांडूळ खत निर्मिती अशा विविध नैसर्गिक निष्टाची निर्मिती करून ठेवावी. जेणेकरून येणाऱ्या हंगामामध्ये शेतीसाठी लागणारे निविष्ठा मार्केटमधून विकत आणायची वेळ येणार नाही कंपनीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पुढील वर्षाच्या प्रमाणीकरणा करिता अर्ज द्यावा योग्य ती कारवाई करावी व कंपनीच्या विकासाकरिता शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री करता मार्केटिंग साखळीमध्ये उतरावे असे आवाहनवाशिम जिल्ह्यामध्ये नैसर्गिक शेती संकल्पना रुजवणाऱ्या शेतकऱ्याच्या अधिकारी प्रकल्प संचालीका आत्मा वाशिम मा. अनिसा महाबळे मॅडम यांनी केले कंपनी स्तरावरील खरीप हंगाम आढावा बैठकी करिता कंपनी अध्यक्ष राहुल रवीराव यांच्या मार्गदर्शनात संचालक शेतीनिष्ठ रवींद्र गायकवाड उपस्थित होते तसेच डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन कंट्रोल रूम वाशिमचे प्रमुख माननीय श्री संदीप मोरे साहेब, मंडळ कृषी अधिकारी गुणवंत ढोकणे साहेब तसेच मास्टर ट्रेनर व नियंत्रण निरीक्षक उपस्थित होते . *कृषी सखी प्रशिक्षण शिबिराला दिली भेट* राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नव्याने निवड झालेल्या गाव पातळीवर कार्य करणाऱ्या कृषी सखी करिता प्रकल्प संचालक आत्मा वाशिम यांच्याकडून प्रशिक्षण देणारी यंत्रणा कृषी विज्ञान केंद्र करडा मार्फत श्री गुरुदेव सेवाश्रम शांतीनगर या ठिकाणी पाच दिवसाचे प्रशिक्षणाचे आयोजन केले होते सदर प्रशिक्षणाच्या प्रथम दिवशी प्रकल्प संचालक अनिशा महाबळे यांनी कृषी प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन उपस्थित कृषी सखी यांचा परिचय करून घेतला व राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन संकल्पना उपस्थित कृषी सखींना समजून दिली यामध्ये समाधानकारक कृषी सखी यांची नियुक्ती न झाल्यामुळे सदर प्रशिक्षण हे पुढील तारखे मध्ये ढकलण्यात आले. यावेळी अनिता मावळे यांनी नैसर्गिक शेती करता देशी गाय अतिशय महत्त्वाची असल्याबाबत व त्यासंबंधी सविस्तर माहिती उपस्थित कृषी सखी यांना दिली सदर प्रशिक्षण शिबिराला कृषी विज्ञान केंद्रप्रमुख डॉ.रवींद्र काळे व त्यांची प्रशिक्षण सहकार्य टीम उपस्थित होते असे असल्याचे कृषी प्रतिनिधी त्यांनी कळवले
