शेगाव येथील पालीवाल पेट्रोल पंपावर दुचाकीने घेतला पेट,पेट्रोल पंपाच्य कर्मचाऱ्यांची दबंग कामगिरी कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

शेगाव येथील पालीवाल पेट्रोल पंपावर दुचाकीने घेतला पेट,पेट्रोल पंपाच्य कर्मचाऱ्यांची दबंग कामगिरी कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

अमिन शेख सहसंम्पादक

शेगाव : शेगाव शहर येथील पालडीवाल यांच्या पेट्रोल पंपावर दिनांक 11 मे 2025 रोजी दुपारच्या सुमारास एक मोठी दुर्घटना टळली. एका दुचाकीस्वाराने आपल्या वाहनात पेट्रोल भरत असताना अचानकपणे दुचाकीच्या टाकीने पेट घेतला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि इतर वाहनचालक यांच्यात एकच धावपळ उडाली.मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी थांबला होता. पेट्रोल भरले जात असताना अचानक दुचाकीच्या टाकीजवळ आग लागली. आगीच्या ज्वाळा पाहून एक क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पेट्रोल पंपावरील एका हुशार, आपल्या चालाकीने कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत तातडीने अग्निशमन रोधक सिलेंडरचा वापर केला. कर्मचाऱ्याने आपल्या जिवाची परवा न करता आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.या घटनेत दुचाकीचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीव हानी झाली नाही. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या या बहादुरीचे आणि सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *