जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भट रायपूरचा 100% निकाल

जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भट रायपूरचा 100% निकाल

बुलढाणा तलुका प्रीतिनिधी जावेद शाह

दि. 13 में राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट रायपूर शाळेचा माध्यमिक परिक्षा 2025 चा घवघवीत निकाल लागला असून 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत माध्यमिक परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला. यात जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भट रायपूरचा 100% निकाल लागला आहे. शाळेचे एकुण 30 विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ट झाले होते. सर्वंच विद्यार्थी चांगल्या टक्केवारीने उत्तीर्ण झाले आहे. तसेच टक्केवारीत विद्यार्थ्यांनी भरारी घेतली आहे. लागलेल्या निकालात 96.60% गुण मिळवत प्रथम क्रमांक आदित्य जिवन सिरसाट व प्रणव अंबादास देशमाने यांनी मिळवला तर 95.80 % गुण मिळवत द्वितीय क्रमांक समर्थ मदन देशमाने याने मिळवला तर तृतीय क्रमांक 92.40 % गुण मिळवत श्वेता गणेश जुंबड हिने पटकावला. तसेच शाळेचे 90% च्या वरती 9 विद्यार्थी असुन 85 ते 90% दरम्यान 7 विद्यार्थी आहेत व 80 ते 85 दरम्यान 10 विद्यार्थी आहेत तर उर्वरित 4 विद्यार्थी 70% च्या वरती आहे. या मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष संदीप दादा शेळके त्याचबरोबर शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. निकालाबाबत बोलताना संस्था अध्यक्ष संदीप दादा शेळके म्हणाले की, सातत्याने विवीध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेत होत असलेले कलात्मक अध्यापन व उच्चशिक्षित शिक्षक वर्ग, त्याचबरोबर शाळेची शिस्त, प्रशासन, तसेच उपलब्ध सुविधा, डिजिटल माध्यमातून होणारे प्रशिक्षण व शिक्षण तसेच शाळेत होणारे अतिरिक्त नियमित शिकवणी वर्ग या सर्वांमुळे यावर्षी निकालाची टक्केवारी सुधारली आहे. त्याचबरोबर इथून पुढे आपण चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांनी केवळ टक्केवारी कडे न बघता गुणवत्तेच्या दृष्टीने प्रयत्न करावा यासाठी जिजाऊ ज्ञान मंदिरात गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहोत. निश्चितच पुढील भविष्य आपले आहे. आज लागलेल्या निकालावरून निश्चितच गुणवत्ते बाबतीत आपण पुढारलो आहोत. जिजाऊ ज्ञान मंदिर उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. स्पोर्ट मध्ये 27 विद्यार्थी राज्य स्तरावर गेले ही आनंदाची बाब आहे. खेळाबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता ही वाढत आहे ही निश्चित आनंदाची बाब आहे. या लागलेल्या निकालामध्ये खेळामध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्यासाठी मदत झाली. भविष्यातही त्यांना करिअरसाठी याचा उपयोग होईल. या पुढील शैक्षणिक भविष्यासाठी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा! असे म्हणाले.या निकालासाठी प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *