सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने बुद्ध भीम गीते व प्रबोधनात्मक कार्यक्रम

बुलढाणा घाटावर भीम जयंती ची बुलढाण्यात जय्यत तयारी.सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने बुद्ध भीम गीते व प्रबोधनात्मक कार्यक्रम…

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे

बुलढाणा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक या मुख्य चौकातील महामानवांच्या पुतळ्यांना झेंडे पताका, लाइटिंग लावून भीम जयंती ची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडर वरील पथदिव्यांवर निळे ध्वज लावण्यात आल्या असून बुलढाणा शहरातील विविध चौकांमध्ये तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सुसज्ज अशी तयारी करण्यात आली आहे तसेच जयस्तंभ चौकातील गांधी भवनात सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध प्रबोधनात्मक बुद्ध भीम गीते तसेच व विचारवंत यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.आज सकाळी पाळणा गाण्यात आला आहे त्यानंतर बुलढाणा शहरात भव्य मोटरसायकल बाईक रॅली काढण्यात आली. जयस्तंभ येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले आहे. व सायंकाळी भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *