
दवंडी/मुनादी शेगाव स्वस्त धान्य दुकानदार आणि शेगाव शहर अध्यक्ष मंगेश देशमुख यांच्या वतीने जाहीर सूचना
अमीन शेख सह,संपादक
शेगाव, ऐका हो ऐका, सर्व गावकरी कार्डधारक यांना सुचित करण्यात येते की,
केशरी पिवळ्या व शुभ्र रेशनकार्ड असणाऱ्यांची शासन निर्णय नुसार शिधापत्रिका तपासणी करण्यात येणार आहे.यासाठी कार्डधारक यांनी शिधापत्रिका तपासणी नमुना हमीपत्र सह स्वस्त धान्य दुकानदार यांचे कडे भरून द्यायचे आहे. सदर फॉर्म सोबत शासनाने निर्धारित केलेल्या 10 पुराव्यांपैकी कोणताही एक रहिवास पुरावा एक वर्षापेक्षा जुना नसेल असा सोबत जोडायचा आहे. तसेच अंत्योदय व प्राधान्य योजनेअंतर्गत जे लाभार्थी धान्याचा लाभ घेत आहेत त्यांनी विहित हमीपत्र सह उत्पन्न दाखला व आधार कार्ड सोबत जोडणे अनिवार्य राहील. जे शासकीय निमशासकीय खाजगी कंपन्यातील कर्मचारी कामगार धान्य योजनेचा लाभ घेत असतील व त्यांचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असल्याचे आढळल्यास अशा शिधापत्रिका तात्काळ रद्द करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे सर्व कार्ड धारक यांनी तपासणी फॉर्म दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत आपल्या स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जमा करावयाचा आहे. जे कार्डधारक विहित कालावधीत सदर अर्ज जमा करणार नाहीत त्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याची कार्यवाही पुरवठा विभागाकडून करण्यात येईल याची सर्व शिधापत्रिकांनी नोंद घ्यावी.
आदेशावरून
