
खामगाव ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी सचिन बोहरपी,सचिव पदी संदीप राठोड यांची निवड
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या खामगाव तालुका अध्यक्षपदी एकमताने सकाळ वृत्तपत्राचे खामगाव प्रतिनिधी सचिन बोहरपी यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण जिल्हा पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रमोद बाप्पू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गुप्तेश्वर आश्रम शिर्ला नेमाने या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खामगावा ग्रामीण भागातील खामगाव तालुक्यातील सर्व वृत्तपत्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिर्ला नेमाने ग्रामपंचायत सरपंच राजेश चव्हाण,जयरामगड येथील सरपंचपती सुनील जाधव, माजी सरपंच सुधाकर धोटे आंबेटाकळी, राजेंद्र टिकार बोरी अडगाव, जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा संघटक संतरामजी तायडे, दिव्य मराठी वृत्तपत्राचे खामगाव प्रतिनिधी नाना हिवराळे हे व्यासपीठावर उपस्थित होते.ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोदबापू देशमुख यांनी खामगाव तालुका ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणी घोषित केली. तालुका अध्यक्ष म्हणून सचिन बोहरपी, कार्याध्यक्ष अनिल गिरे, उपाध्यक्ष धनंजय गोतमारे, उपाध्यक्ष सहदेव वाकोडे, सचिव संदीप राठोड सहसचिव, कैलास गाडे कोषाध्यक्ष, कैलास नांदोकार प्रसिद्धी प्रमुख, गजानन धंदरे सल्लागार, रविंद्र गुरव सल्लागार,प्रा श्रीकृष्ण चौधरी संघटक, विनोद देशमुख सह संघटक, अनंतसिंग बोराडे, सुधीर टिकार, भागवत राऊत, अजिस अहमद शेख, नितीन इंगळे, सिद्धेश्वर निर्मळ, नवनीत सोनाळकर गजानन सोनवणे यांच्यासह इतर पत्रकारांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र गुरव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण चौधरी यांनी केले.
