
दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे
मागणीश्रवणबाळ, संजय गांधी योजनेच्या रखडलेले प्रकरने तसेच आधार कार्ड उपडेट बाचत निवेदनआपणास विनंतीपूर्वक निवेदन सादर केल्या जात आहे की, गेल्या ४ महिन्यापासून आवण बाळ व संजय गांधी निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या बर्याचश्या लाभर्थ्यांचे अनुदान रखडलेले असून त्याकरिता तहसील कार्यालय नांदुरा येथून लामार्थ्यांना आधार कार्ड उपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु बहुतांश लाभार्थ्यांच्या श्रवण बाळ योजनेच्या केसेस ह्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दाखल्यावरून व त्यांच्या मोठ्या मुलाच्या टीसीच्या वयानुसार प्रकरणे आपल्या तहसील कार्यालयात यापूर्वी मंजूर झालेले आहेत, ज्या वृद्ध व्यक्तींची प्रकरणे आपल्या तहसील कार्यालयाला प्रलंबित आहेत.त्या लोकानकडे कोणत्याही प्रकारचे जन्माचे दाखले किव्हा शाळेचे दाखले उपलब्ध नाहीत कारण त्यांचे जन्माचे नोंद कुठेही केलेली नसून ते शाळा सुद्धा शिकलेले नाही त्यामुळे वैद्यकीय अधिकारांच्या व त्यांच्या मोठ्या मुलाच्या टीसी च्या दाखलयानुसार त्यांची श्रवण बाळ योजनेची प्रकरणे मंजूर करण्यात यावी. ज्या लोकांना आधी पगार मिळत होता परंतु आताच्या नवीन नियमांनुसार श्रवण बाळ योजनेच्या लाभर्थ्यांना आधार कार्ड वर जन्म तारीख अपडेट केल्याशिवाय अनुदान मिळणार नाही अश्या सूचना तहसील कार्यालयातून देण्यात येत आहेत. याबाबत शासनाने ज्या लोकांकडे जन्माचे दाखले किहा शाळेचे दाखले नाहीत अश्या लाभार्थ्यान करिता आधार कार्ड अपडेट ची स्वतंत्र योजना आणि आधार केंद्रावाल्यांना सूचना देण्यात याव्या.दिलेल्या निवेदनाची दाखल न घेतल्यास अति तीव्रतेने संघटणे मार्फत तहसील कार्यालयासमोर उघडे लोटांगण आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील. त्यावेळी दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे बुलढाणा जिल्हा सचिव प्रकाश चोपडे तसेच संघटनेचे पदाधिकारी इतर कार्यकर्ते उपस्थित होते
