कुणाल कामरा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे

कुणाल कामरा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे

मलकापूर : स्वैराचार करणाऱ्या कुणाल कामरा वर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमराज कोळी यांच्याकडे केली आहे कॉमेडियन कुणाल कामरा या स्टँड अप कॉमेडियन याने विडंबनात्मक गाणे गाऊन शिवसेना पक्ष प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवण्याचा गैरप्रकार केला. एवढच नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गद्दार म्हणुन सुध्दा उल्लेख केला. कुणाल कामरा याने केलेल्या विडंबनात्मक प्रकारामुळे शिवसेना व महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त होत आहे. कुणाल कामरा याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी त्याचा स्वैराचार कसा खपवुन घ्यायचा ? गद्दार कोण खुद्दार कोण हे या महाराष्ट्रातील जनतेने निवडणुकित दाखवुन दिले आहे. कुणाल कामरा हा नालायक प्रवृत्ती चा व्यक्ती असुन त्याने केलेल्या बेताल विडंबनात्मक गाण्याचा आम्ही तिव्र शब्दात निषेध व्यक्त करातो. तसेच या प्रकरणी कुणाल कामरा विरुध्द कलम ३५३(१) (ब) (सार्वजनिक त्रास देणारी विधाने) आणि कलम ३५६ (२) (बदनामी) आदी कलमे समाविष्ट असलेल्या बी.एन.एस.च्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात यावा. या अनुषंगाने शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे सहविभाग प्रमुख सुरेश अहीर, विनोद बोदडे, गजानन धाडे, संदेश शिंदे,सचिन चव्हाण,शुभम देशमुख आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी थेट दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठीत पोलीस निरीक्षक हेमराज कोळी यांच्यासोबत चर्चा केली. दरम्यान कुणाल कामराविरुद्ध कायदेशीर रित्या गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी आग्रही मागणी लावून धरली असता याप्रकरणी निश्चितच कायदेशीर रित्या कार्यवाही केली जाईल अशी आश्वासन पोलीस निरीक्षक कोळी यांनी दिले. तर कुणाल कामराविरुद्ध शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांनी लेखी स्वरूपात तक्रार सुद्धा दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *