परंडा गाव चे प्रभारी सरपंच यांना जीवे मारण्याची धमकी

परंडा गाव चे प्रभारी सरपंच यांना जीवे मारण्याची धमकी

प्रतिनिधी अकोला परंडा या गावचे सरपंच गणेश नामदेवराव कोकाटे यांचा कडे प्र.सरपंच पद असून गेल्या दोन वर्षात गावात दोन कोटी च्या वर विकासकामे झाली असून, गावातील एक समाज कंटक उमेश सिदाजी कोकाटे हा गावात दारू,गांजा, वरलीमटका असे अनेक धंदे करत आहे.मी स्वतः त्या या कामाला विरोध केला असता त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.७०,०००रू खंडणी ची सुध्दा मागणी केलेली आहे.पैसे न दिल्यास तुला जिवाने मारून टाकेल असे कृत्य सरपंचा सोबत होत आहे.या विषयी मी मुख्य पोलीस अधिक्षक साहेबांना आणि बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे.तरी आज रोजी सरपंच वर खुप प्राण घातक हल्ले होत आहे दोन सरपंचाचे जीव गेले आहे.त्यामुळे माझ्या परिवारात भयभीत करणारे वातावरण निर्माण झाले आहे.तरी परंडा गावातील हे अवैध धंदे लवकरात लवकर बंद करण्यात यावे व सरपंचाला सुरक्षितता देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *