
बलिदान दिवसा निमित्त एकनिष्ठा कडून रक्तदान व अन्नदान
दिनांक 20/03/2025 खामगांव :- एकनिष्ठा गौ -सेवा रक्तसेवा फाऊंडेशन यांच्या वतीने सामान्य रुग्णालयात खामगांव येथे 23 मार्च बलिदान दिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन व अन्नदान वाटप करण्यात आले होते. सध्या शासकीय रक्तपेढी मध्ये रक्ताचा फार भयंकर तुटवडा असल्याने एकनिष्ठा फाउंडेशन तर्फे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दिनांक 18 मार्च रोजी रक्तदान शिवीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले नविन युवा तरूण पिढीला एक नवा आदर्श या रक्तदानातून मिळाला.समाजात सध्या गंभीर आजार होणे थैलीसिमिया, सिकलसील, आकस्मिक मृत्यू, कँन्सर ,अँक्सीडेंट, शरीरात रक्ताची कमतरताचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेले आहे अश्या वेळेस पिडीत व्यक्तींना रक्ताची कमतरता भासू नये एक नवीन संकल्प विचार घेत एकनिष्ठा फाउंडेशननी मागील 15 वर्षा पासून हा उपक्रम राबविण्याचा वसा हाती घेतलेला आहे अशी माहिती सुरजभैय्या यादव यांनी दिली. रक्तदान शिवीराचे प्रमुख पाहुणे मा. श्री. रामकृष्ण पवार ठाणेदार शहर पोलीस स्टेशन हे तर अध्यक्ष स्थानी पत्रकार राजु घाटे यांच्या उपस्थितीत दि. 18 मार्च रोजी शासकीय रक्तपेढी येथे रक्तदान शिवीराला सुरुवात झाली शहिद विर भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांनी हसत हसत फाशीचा फंदा आपल्या गळ्यात घेऊन आपल्या भारत देशासाठी जे बलिदान दिले हा आदर्श आपल्या डोळ्या समोर घेत रक्तदाते सुरजभैय्या यादव, सौ. संगीता सुहास देशमुख, जितेंद्र मच्छरे, आनंदसिंग चव्हाण, दिपक राऊत, रुपेश सिंघानिया, दत्ता खेलदार, शिवम मानकर, वैभव कापडे, गजानन मच्छरे, मुकिंदा बोंबटकार, अजय निंबाळकर, गोपाल धोटे, हरीष पंजवानी, विकास शेगोकार, धिरज श्रीवास्तव, नंदकिशोर मिरगे, सुरज काटे, महादेव वाडेकर, नरेश मसनेवार, पंकज इंगळे, अजय जाधव, कार्तिक तंबोली, पवन क्षीरसागर, लखन बोरुडे, शंकर आमले, अंकुश अंबुलकार, सुरज इंगळे, योगेश राऊत, किशोर बोंबटकार, राहुल तायडे, शुभम क्षीरसागर, सुमेध सावंग, श्याम भगतपुरे, गोपाल बढे, श्रीकृष्ण ढोले, प्रतिक अवकाळे, ऋषीकेश सोळंके, जगमीत सिंह सिद्धू, योगेश राऊत, विनोद घोराळे, विकी नामगे, महादेव खंडारे, प्रथमेश शेगोकार, करण सावरकर, दिपक दादा, अतुल गावंडे आदि लोकांनी खामगांव शासकीय रक्तपेढी मध्ये रक्तदान केले तर ज्ञानेश्वर पर्वते, मंगेश देशमुख, अनिल चव्हाण, आशिष बोबडे यांनी अकोला, बुलढाणा, शेगांव, मलकापूर येथे जाऊन रक्तदान केले.यावेळी ज्ञानेश सेवक सर, प्रदीप शमी, धिरज यादव, सुनील राऊत, सिद्धेश्वर निर्मळ, चेतन कदम,सौरभ पाटील, खुशाल सेवक, अक्षय मानेकर,गोपाल इटीवाले, अंकलेश धांदू, निलेश भाटी, राहुल चव्हाण, विकास धांदू, अथर्व जोशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शासकीय रकतपेढीचे सौ. प्रणाली देशमुख, सौ. सपना कांबळे, अली, भारती काळे, अशोक पराते यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राजु घाटे हे होते सूत्रसंचालन डॉ. निशांत मुखीया यांनी केले तर आभार रवी माळवंदे यांनी मानले.
