नांदुरा तालुक्यातील शेंबा गावातील नऊ ते दहा बकऱ्या चोरी

नांदुरा तालुक्यातील शेंबा गावातील नऊ ते दहा बकऱ्या चोरी

नांदुरा. प्रतिनिधी नागेश सुरंगे

दिवसेंदिवस वेगवेगळी शक्कल लढवून चोर चोरी करत आहे.
अशीच घटना( दि. 11)नांदुरा तालुक्यातील शेंबा येथे रात्री तीन वाजता घडली असून चोरट्यानी सुधीर रमेश खर्चे यांच्या गोठ्यातुन बकऱ्या चोरण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये बकऱ्या चोरून फोरव्हिलर गाडीमधे ठेवताना दिसत आहे.त्यामुळे बकऱ्या पाळून उपजीविका करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शें बा येथील खर्चे कुटुंबाच्या नऊ /दहा बकऱ्या (ता. 11) रात्री चोरीला गेल्याचा प्रकार रात्री 3 वाजे दरम्यान घडला आहे. खर्चे यांचा शेती व्यवसाय असून सोबतच शेळीपालन व्यवसाय आहे.खर्चे यांनी बकऱ्यांची खरेदी करून आपल्या मोताळा फुली रोडवर असलेल्या शें बा गावातील जागेत बंदिस्त खोलीत ठेवल्या होत्या; मात्र मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून नऊ /दहा बकऱ्यांची चोरी केली. याबाबत खर्चे यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बकऱ्या चोरीला गेल्याने या कुटुंबाला 85 ते 95 हजार रुपयाचा फटका बसला आहे. यापूर्वी सुद्धा जनावरे चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.पुढील तपास बोराखेडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *