
आई तुळजाभवानी फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती निमित्त विशेष सत्कार सोहळा संपन्न
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूरः छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आई तुळजाभवानी फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते यामध्ये शिवपुजन, मिरवणूक, मोटरसायकल रॅली तथा सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमासह पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत असतो. यंदाच्या वर्षी काही कारणास्तव पुरस्कार वितरण सोहळा १९ फेब्रुवारीच्या कार्यक्रमावेळी संपन्न होऊ शकला नाही.त्या अनुषंगाने विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण विषयक क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना तसेच गुणवंत विद्यार्थी व प्रतिभावान खेळाडूंना गौरविण्याच्या उद्देशाने विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. येथील नगर परिषद छत्रपती

शिवाजी महाराज सभागृह मध्ये घेण्यात आलेल्या या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थितांमध्ये तहसीलदार राहुल तायडे, ठाणेदार गणेश गिरी, नप उपमुख्य अधिकारी विठ्ठल भुसारी, अमित कॉट फायबरचे संचालक सुमित चौधरी, रेल्वे विभागाचे ठाणेदार जसबीरसिंग राणा, वेदांश आयुर्वेदिक चे वैद्य अमित चौधरी, आई तुळजाभवानी फाउंडेशनचे अध्यक्ष शिवराज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.या विशेष सोहळ्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते पत्रकार तथा आई तुळजाभवानी फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेष सत्कार सोहळ्याकरिता शुभम बोबडे कुणाल बोराडे तेजस हिंगे यांच्यासह अनेकांचे योगदान राहिले. संचालन नितीन भुजबळ तर आभार प्रदर्शन रवी कुमार शर्मा यांनी केले.
