रायपूर येथे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे जिल्हा परिषद आदर्श मराठी प्राथमिक शाळा वाटर रोड रथयात्रेचे पूजन करून स्वागत करण्यात आले

रायपूर येथे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे जिल्हा परिषद आदर्श मराठी प्राथमिक शाळा वाटर रोड रथयात्रेचे पूजन करून स्वागत करण्यात आले

प्रतिनिधी जावेद शाह बुलढाणा तालुका ( रायपूर) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आज दि 21 फेब्रुवारी2025 रोजी मौजे रायपुर. समूह 06 मध्ये .मान्यवरांच्या उपस्थितीत वॉटर शेड रथयात्रेचे पूजन करून स्वागत करण्यात आले. मुख्य मार्गदर्शक कार्यक्रम जी.प. आदर्श मराठी प्राथमिक शाळा रायपूर. आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मोहनराव पवार( जिल्हा भाजपा प्रमुख) तसेच प्रमुख अतिथी मा. श्री विठ्ठल कुंभरे( तहसीलदार बुलढाणा)मा. श्री दुर्गेश राजपूत पोलीस स्टेशन रायपुर) सौ. सीमा सुनील देशमाने ( सरपंच रायपूर)मा.श्री. मनीषजी गवई साहेब उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यान्विक यंत्रणा बुलढाणा हे होते. मान्यवरांची आयोजित भाषणे झाली. वाटर शेड रथयात्रेने रथयात्रेने व्यापक स्वरूप घेऊन लोक चळवळ व्हावी. असा निश्चित करण्यात आला .मा.कु. जागृती चौधरी मॅडम यांनी उपस्थित त्यांना जलसंधारणाची शपथ दिली. वाटर शेड रथयात्रे पूर्वी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात .पाणनेर योद्धा, लखपती दीदी ,धरणी ताई. या पुरस्काराने सुद्धा निवड झालेल्या लोकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास्थळी अनेक महिला बचत गटांनी आपल्या व्यवसायाचे स्टॉल लावले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गावकरी व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नमुद जलसंधारण विभागीय बुलढाणा पानळोर समिती रायपुर ग्रा. प.रायपुर प्र .का. तथा उपविभागीय जलसंधारण अधिकारी नमुद जलसंधारण उपविभाग, बुलडाणा. यानी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *