
तालुक्यातील ग्राम धानोरा येथील महासिद्ध महाराज विद्यालयाच्या सन २००८ सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल १८ वर्षांनंतर स्नेह मिलनाचा कार्यक्रम दिनांक १४ फेब्रुवारी रोजी पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजनकार सर तर प्रमुख पाहुणे म्हणून वानखडे सर, वसतकार सर, धर्माळ सर, होरोळकर सर, पालकर सर, हिस्सल सर, बोंबटकर सर, या सर्व शिक्षकांची उपस्थिती होती. या सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संचालन राजु घुले यांनी केले तर आभार प्रदर्शन वृषालीताई सुरपाटणे

वकल्याणी ताई खुपासे यांनी केले. कार्यक्रमाला अविनाश कुले, अमोल जाधव, दिपक अवचार, रवि वावगे, राजु साबे, किशोर गजगण, संतोष सोनोने, सचिन पाटील, शिवा बघे, किसना बघे, अतुल दाते, सोपान उमाळे, विशाल वावगे,

किशोर चंदनकार, कल्याणी सुरपाटणे, अनिता धीरज गाडगे, त खुपासे, वृषाली सारिका अवचार, गावंडे, भारती गायकवाड, जया वावगे, दीपाली पाटील, मनीषा चंदनकार, वंदना गव्हाळे, पुष्पा निर्मळ, पुष्पा खेरडेकर, स्वाती खुपसे, अनिता खापरे, मीनाक्षी वावगे यांची उपस्थिती होती. १८ वर्षाच्या प्रदिर्घ प्रतीक्षेनंतर सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीं एकमेकाना भेटले.
