
तहसील कार्यालयावर दिव्यांग बांधवांचा बेधडक मोर्चा धडकला..
जळगाव जामोद प्रतिनिधी…
जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांगानी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन २७ जानेवारी रोजी दिले होते. परंतु याची साधी दखल सुद्धा तहसीलदार व प्रशासनाने घेतली नाही.व दिलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखवली. म्हणून प्रहार संघटनेच्या वतीने असंख्य दिव्यांग बांधवांनी मिळून दिनांक १४ फेब्रुवारी रोजी प्रहार दिव्यांग संघटनेचे जळगाव जामोद तालुकाध्यक्ष नारायण महाले यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जामोद तहसील कार्यालयावर बेधडक मोर्चा काढून दिव्यांग बांधवांनी आपल्या मागण्या रेठून धरल्या असता तहसिल कार्यालय मार्फत लेखी आश्वासानंतर दीव्यांग बांधवांनी आपल्या मोर्चाची सांगता केली. यावेळी तालुकाध्यक्ष नारायण महाले सचिव सरदार अवासे, श्रीरंग बहादरे, ज्ञानेश्वर खेडकर, मोहन नेमाने, दामाजी तायडे, शोभा दांडगे, दिगंबर वानखडे, रामभाऊ अनिल धर्मे, अमीर शहा ,कल्पना ,गोकुळा चंदनशिव, संतोष इंगळे, अशोक भगत, नामदेव फाटे, लिलाबाई कराळे वाघ ,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संदीप उगले, नाईक ,सुधीर इंगळे ,राजू बडरे यांच्यासह बहुसंख्य दिव्यांग बांधव यावेळी बेधडक मोर्चा उपस्थित होते.
