सावरगाव चोरी प्रकरणी ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या पथकाची कारवाई.. दोनच दिवसात आरोपी ताब्यात..

सावरगाव येथील चोरी प्रकरणी पोलिसांनी केली सराईत आरोपीस अटक.. आरोपीच्या ताब्यातून मोटरसायकल व कॅश जप्त…

जळगाव जामोद प्रतिनिधी-जळगाव जामोद तालुक्यातील सावरगाव येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या. त्यामध्ये फिर्यादी शरद पाटील यांचे घराचे वॉल कंपाऊंडच्या आत ठेवलेली मोटरसायकल व तेथीलच तुषार पाटील यांच्या दुकानाचे शटर तोडून चार हजार रुपये कॅश चोरून नेण्याची घटना नुकतीच घडली होती. यामध्ये पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शोध घेतला असता गोराळा धरण शिवारामध्ये चोरांचा सुगावा लागला यावेळी तपास अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार यांनी वरिष्ठ अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांना याबद्दल माहिती दिली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार व पोलीस कॉन्स्टेबल मधुकर गाढे यांनी गोराळा धरण येथे जाऊन आरोपीच्या ताब्यातील मोटरसायकल व नगदी १ हजार रुपये जप्त करून आरोपीचे मानसिंग भैड्या वय २८ वर्षे राहणार कहूपट्टा तालुका जळगाव जामोद याला अटक करण्यात आली आहे. मानसिंग भैड्या हा सराईत आरोपी असून त्यास तडीपार सुद्धा केले आहे. सदरची कारवाई ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे तपास अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार व सहकारी मधुकर गाडे यांनीही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. या अगोदर सुद्धा पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार यांनी जामोद येथे सुद्धा ९ मोटरसायकलींसह २ आरोपींना अटक केली होती व मोठा चोरीचा गुन्हा उघड केला होता हे विशेष. यावेळी ठाणेदार श्रीकांत निचळ पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार पोलीस शिपाई मधुकर गाढे व सचिन राजपूत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *