सेट तुळशीरामजी ढोकणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे मानेगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर

सेट तुळशीरामजी ढोकणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे मानेगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर…

जळगाव जामोद प्रतिनिधी नागेश सुरंगे

सेठ तुळशिरामजी ढोकणे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, आसलगांव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा राष्ट्रीय सेवा योजना+२ युनिट तर्फे दत्तक ग्राम मानेगाव येथे आयोजित ग्रामीण विशेष श्रम संस्कार शिबीराचा उद्घाटन सोहळा पार पडला.उद्घाटन समारंभाचे अध्यक्षा माननीय सौ. ज्योतीताई अशोकराव ढोकणे, उद्घाटक वामनराव फंड साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक नानासाहेब कांडलकर सर व प्रमुख उपस्थिती मध्ये महादेव कुवारे सर केंद्रप्रमुख आसलगाव, माननीय श्री हागे सर केंद्रप्रमुख खांडवी, माननीय सौ अलकाताई मिरगे सरपंच ग्रामपंचायत मानेगाव मा.शिवाजी पैसोडे उपसरपंच ग्रामपंचायत मानेगाव,ढोकणे महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योती वानेरे मॅडम, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रभा वावगे मॅडम, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मार्गदर्शनपर बोलताना उद्घाटक गटशिक्षणाधिकारी जळगाव जा. माननीय वामनराव फंड साहेब यांनी शिक्षणापेक्षा संस्कार कसे श्रेष्ठ असतात तर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय नानासाहेब कांडलकर सर यांनी कष्टाशिवाय पर्याय नाही… असे प्रतिपादन केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्षा माननीय ज्योतीताई ढोकणे यांनी श्रम व संस्कार यांचीची सांगड कशी घालावी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत हितगुज साधले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना महाविद्यालयाच्या प्राचार्या माननीय ज्योती वानेरे मॅडम यांनी शिबिराच्या सात दिवशीय कार्यक्रमांची विस्तृत माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांनी कुमारी स्नेहल गावंडे व गौरी निर्मळ तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक अतुल उमाळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *