चैनसुख संचेतींनी तालिका अध्यक्ष म्हणून सांभाळले सभागृहाचे कामकाज

चैनसुख संचेतींनी तालिका अध्यक्ष म्हणून सांभाळले सभागृहाचे कामकाज

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे हिवाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी १८ डिसेंबर रोजी विधिमंडळात सभापती राहुल नार्वेकर यांच्या खुर्चीवर बसून कामकाज पाहिले. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा कामकाजासाठी सदस्य चैनसुख संचेती यांची तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात नियुक्ती जाहीर केली. ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अथवा उपाध्यक्ष यांना काही काम असते, त्यावेळी तात्पुरते अध्यक्ष म्हणून तालिका अध्यक्ष कामकाज पाहतात.अशावेळी विधिमंडळ कामकाजाचा अनुभव असलेले चैनसुख संचेती यांना तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. त्या अधिकारान्वये आज चैनसुख संचेती यांनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून कामकाज पाहिले. जबाबदारीही सांभाळली.या कामकाजाचे लाइव्ह प्रसारण संपूर्ण राज्याने पाहिले. मलकापूर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने हे प्रसारण पाहत वेगळाच आनंद अनुभवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *