सुनगांव येथे मृदादिन कार्यक्रम साजरा…

सुनगांव येथे मृदादिन कार्यक्रम साजरा…

जळगाव जामोद प्रतिनिधीमहाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आज दिनांक ०५ डिसेंबर 2024 रोजी सुनगांव येथे जागतीक मृदा दिनाचे औचित्य साधुन मृदादिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद यांचे वतीने करण्यात आले.कार्यक्रमाला सुनगांवचे सरपंच रामेश्वर अंबळकार यांनी उपस्थित दर्शवली असुन, कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी वाकोडे साहेब, कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथील तज्ञ मार्गदर्शक संजय उमाळे साहेब, मंडळ कृषी अधिकारी पाटील मॅडम, भटकर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम मान्यवरांच्या व शेतक-यांच्या हस्ते माती पुजनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आत्मा योजनेचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर राऊत यांनी केले असुन त्यांनी मातीसाठी आवश्यक गांडुळ खत व सेंद्रिय खत तयार करणेबाबत मार्गदर्शन केले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक धीरज वाकोडे यांनी केले असुन त्यांनी मातीचे महत्त्व व मातीचे गुणधर्म बाबत उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.कृषी वीज्ञान केंद्र जळगाव जामोद येथील तज्ञ मार्गदर्शक संजय उमाळे साहेब यांनी माती परीक्षणाचे महत्त्व व मातीचे सृदृढ आरोग्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कृषीअधीकारी भटकर साहेब यांनी माती नमुना काढणेबाबत मार्गदर्शन केले.सरते शेवटी मंडळ कृषी अधिकारी पाटील मॅडम यांनी मृदा तपासणी अहवालातील विविध बाबी बाबत मार्गदर्शन केले व कार्यक्रममचे आभार प्रदर्शन कृषी सेवक श्री गव्हाणे साहेब यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनगांव येथील कृषी मित्र मोहनसिंह राजपुत यांनी परीश्रम घेतले असुन कार्यक्रमाला कृषी विभागातील कर्मचारी श्री.शेळके साहेब, श्री.जागृत साहेब उपस्थित होते.सुनगांव येथील बहुसंख्य शेतकरी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली असुन त्यांनी मृदा दिनानिमित्त मृदेचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी असेलेल्या विविध उपाययोजना अंमलात आणण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *