
जळगाव जामोद प्रतिनिधी–जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये २८ नोव्हेंबर रोजी महान समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जिवनावर आधारित भाषणे दिली.. शाळेच्या शिक्षिका क्षीरसागर यांनी महात्मा फुले यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या घटना व त्यांचे सामाजिक शैक्षणिक कृषी स्थापत्याविषयक कार्य विद्यार्थ्यांना सांगितले.यावेळी महात्मा फुले यांना अभिवादन करताना जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र राखोंडे,उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख मजहर सर, गवई मॅडम,शिक्षक प्रदिप वाकेकर,खिरोडकार सर, उमाळे मँडम,बेग सर,साबे मँडम, अंबडकार सर, बोंबटकर मॅडम, घुले मँडम,यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचलन साबे मँडम यांनी केले तर आभार बेग सर यांनी मानले…
