गौन खनिजाचे तीन टिप्पर लावले तहसील ला..महसूल विभागाची भूमिका संशयास्पद…

तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांची कारवाई….गौन खनिजाचे तीन टिप्पर लावले तहसील ला..महसूल विभागाची भूमिका संशयास्पद…

जळगाव जामोद प्रतिनिधी-

उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील नवीन माहुली गावठाणा जवळ गौण खनिज भरलेले तीन टिप्पर तहसील कार्यालयासमोर लावून महसूल विभागाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. जिगाव प्रकल्प अंतर्गत नवीन माहुली गावठाणा जवळ गौण खनिजाचे तीन टिप्पर तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी पकडले. चौकशी केली असता त्यांच्याकडे कसलीही रॉयल्टी नव्हती. त्यामुळे तहसीलदार पवन पाटील यांच्या आदेशावरून संबंधित मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी हे तिन्ही टिप्पर स्थानिक तहसील कार्यालय समोर उभे केले. त्यांच्याकडे रॉयल्टी नसल्यामुळे त्यांच्यावर तहसीलदारांनी तात्काळ दंडात्मक कार्यवाही करायला हवी होती. परंतु वीस तास उलटूनही काही कार्यवाही न झाल्याने कुठेतरी पाणी मुरत आहे का? असा संशय घेतल्या जात आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाची भूमिका ही संशयास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *