
त्रिमूर्ती कनिष्ठ महाविद्यालयात् संविधानदिन साजरा राष्ट्रीय सेवा योजना युनिट तर्फे आयोजित संविधान दिन मोठया उत्सहात साजरा करण्यात आला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान उद्देशिका चे समूहिक शपथ घेऊन ती अंगीकरण्याची ग्वाही दिली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानि प्राचार्या विद्या काटले मॅडम तर प्रमुखपाहुणे प्रा.मंगेश धांडे उपस्थीत होते. स्वयंसेवकांनी कार्यक्रमांचे उत्कृष्ठ नियोजन केले होते. यावेळी 26/11/ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.संविधानावर आधारित विचार मांडण्यात आले.कार्यक्रमाला प्रा.निमकर्डे,प्रा.वारुकर,प्रा.कु.इंगळे,प्रा.कु वाघमारे,सह बहुसंख्यविध्यार्थी उपस्थीत होते.असेकार्यक्रम अधिकारी प्रा.गावंडे यांनी कळविले आहे.
