
माजी आमदार चैनसुख संचेती यांच्याकडून संकटात मदत मिळालेल्या गोरगरीब, ज्येष्ठ नागरिक, महिलांनी आनंद व्यक्त केला.
मलकापूर : प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर विधानसभा मतदारसंघात जनसंघ आणि नंतर भाजपचे पारंपरिक वर्चस्व राहिले आहे. तसेच प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीने आपले वर्चस्व गाजविले आहे.
यंदाही असेच चित्र असून महायुतीचे अनुभवी आणि मतदारसंघातील घराघरात पोहोचलेले उमेदवार तथा माजी आमदार चैनसुख संचेती यांनी प्रचारात मोठी व दणदणीत आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. मलकापूर विधासभा मतदारसंघाची उमेदवारी सहाव्यांदा माजी आमदार
चैनसुख संचेती यांना जाहीर होताच मलकापूर व नांदुरा तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघात फटाक्यांची आतिषबाजी आणि ‘जिंदाबाद ‘च्या घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला.चैनसुख संचेती यांच्याकडून संकटात मदत मिळालेल्या गोरगरीब, ज्येष्ठ नागरिक, महिलांनी आनंद व्यक्त केला. संचेती यांनी उमेदवारी अर्ज भरताना मतदारसंघाच्या कांना
कोपऱ्यातील कार्यकर्ते, सामान्य नागरिक, महिला, युवक, चाहते मिरवणुकीत सहभागी झाले. ही मिरवणूक अभूतपूर्व ठरली.
या पाठोपाठ संचेती यांच्या प्रचाराला जोरदार प्रारंभ झाला. मलकापूर आणि नांदुरा तालुक्यातील ग्रामीण भागातील खेडोपाड्यात त्यांचा प्रचार सुरू झाला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व चाहते मोठ्या संख्येने मतदारसंघात प्रचार मोहीम राबवत आहेत.सकाळी लवकर आणि रात्री दहा वाजेपर्यंत चालणारा महायुतीचा प्रचार मतदारांना प्रभावित करणारा ठरत आहे. यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र आहे.
