
महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश एकडे यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत दाखल केला उमेदवारी अर्ज
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर विधानसभा मतदार संघाकरीता विद्यमान आमदार राजेश एकडे यांना महाविकास आघाडीच्या वतीने दुसऱ्यांदा उमेदवारी बहाल करण्यात आली. त्यांनी आज २९ ऑक्टोबर रोजी भाराकाँचे महासचिव खा. मुकुल वासनिक यांचेसह आदी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी मलकापूर शहरातून ‘न भूतो न भविष्य’ अशी रॅली काढण्यात आली.
धनशक्ती विरूध्द जनशक्तिचा महासैलाब आज २९ ऑक्टोबर रोजी धनतेरसच्या शुभ मुहुर्तावर भारतीय राष्ट्रीय कांग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार, मलकापूर-नांदूरा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेशभाऊ एकडे यांच्या विधानसभा निवडणूकीचे नामांकन भरण्यासाठी दोन्ही शहरा सोबतच गावकुसातील सर्व घटकांतील सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक एकजुटीने भांऊच्या मागील पाच वर्षापासून जो विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विकासरथ अविरतपणे गतिमान आहे त्याचे आभार मानत हा विकास आणखी जोमाने असाच अखंडपणे सुरु रहावा यासाठी शेतीची सोयाबिन सोंगण्याची गडबड असूनही सामान्यातील सामान्य जनता ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, कृषी उतपन्न बाजार समिती तसेच विविध सहकारी संस्थेचे सदस्य तसेच माहाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत मलकापूर- नांदुरा मतदार संघाच्या इतिहासातील आजपर्यंतची महाविशाल विजय संकल्प यात्रेचा विकास रथ मलकापूर शहरात प्रचंड गर्दीने शहराचा मुख्य मार्ग व्यापुन गेला होता. आज आपल्या सर्वांच्या साक्षीने, ईश्वराच्या आशिर्वादाने आपला निवडणुक अर्ज दाखल केला असून ही महाविकासाची क्रांतीज्योत सर्वांना सोबत घेऊन प्रज्वलित केली आहे. ही विकास
क्रांती ज्योत से ज्योत जलाते चलो विकास की गंगा बहाते चलो म्हणत; आपल्याला आप आपल्या गावा-गावात, घराघरात ही ज्योत घेऊन जात हा विकासाच्या तेजोमय प्रकाशाने आपल्या येणाऱ्या असंख्य दिवाळी आंनदाची व भरभराटीच्या जाण्यासाठी विकास पुरूष आमदार राजेशभाऊ एकडे साहेबांच्या ताकदीने एकजुटीने पाठीशी उभे राहत; प्रचंड बहुमताने निवडुन आणण्यासाठी अविरतपणे २० नोव्हेंबर पर्यंत कार्यरत राहुन जोमाने कार्य केले तर आपले आमदार साहेब नामदार झाल्याशिवाय राहणार नाही.
