
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा खा.मा.मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त एकता दौड – मॅरेथॉन स्पर्धा संपन्न
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे..वरवट बकाल :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा खासदार मुकुलजी वासनिक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज संग्रामपुर युवक काँग्रेसच्या वतीने एकता दौड – मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संग्रामपूर पंचायत समिती संग्रामपूर ते कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय वरवर (बकाल) पर्यंत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. *एकता दौड* – मॅरेथॉन स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांनी राष्ट्रीय नेते मा.श्री.मुकुलजी वासनिक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना युवकांचे प्रेरणस्थान असलेले मुकुलजी वासनिक यांच्या राजकीय व सामाजिक जिवनावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला व उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. या एकता दौड मॅरेथॉन स्पर्धेचा डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांनी हिरवी झेंडी दर्शवून शुभारंभ केला. चार किलोमीटर अतंराच्या या स्पर्धेमध्ये सुमारे जवळपास 132 युवकांनी सहभाग नोंदविला. यामध्ये प्रथम क्रमांक यश रामरतन पांडे, द्वितीय क्रमांक रामचंद्र गजानन मोहळ, तृतीय क्रमांक शशांक दिनकर राऊत, चतुर्थ क्रमांक चेतन अशोक करागंडे तर प्रोत्साहन पर बक्षीस हरिदास चावरे (वय वर्ष 57 ), सर्वात छोटा ईशांत पांडे यांना देण्यात आले. सदर कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगांव जा मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव रामविजय बुरुगले, जिल्हा परिषद मा. अध्यक्ष प्रकाश पाटील, तेजराव मारोडे, संतोष राजनकर, प्रकाश देशमुख, दादासाहेब वर्गे, तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, मिनाक्षिताई हागे, राजेश्वर देशमुख, जाहीर मिस्त्री, गणेश टापरे, निशिकांत देशमुख, प्रशांत गावडे, प्रतिभा इंगळे सरपंच वरवट बकाल, सुरेखा पळसकर,प्रविण भोपळे, हरिभाऊ राजनकर, जगन्नाथ विश्वकर्मा, श्रीकृष्ण तराळे, अभय मारोडे, श्याम डाबरे , राजुभाऊ राठोड , गणेश मानखैर, दिपक गव्हादे, संतोष टाकळकर, जलील सर, शिवकुमार गिरी, अफसर कुरेशी, संतोष येनकर, निलेश अंबुस्कर, नितीन रावणकर, गणेश वानखेडे, सुरेश हागे, श्रीकृष्ण दातार, समीर भाई, धर्मेंद्र इंगळे, दत्ता बोरकर, गोपाल इंगळे आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पंच म्हणुन तालुका क्रीडा संयोजक सुधीर मानकर, तालुका क्रीडा सहसंयोजक गजानन काळे, प्रा. गजानन पैकट सर , प्रा.निशिगंध सातव सर आदींनी काम पाहिले.यावेळी मा. खा. मुकुलजी वासनिक साहेब यांना रामविजय जी बुरुंगले, प्रकशभाउ पाटील,गणेश टापरे, प्रतिभा इंगळे, प्रशांत गावंडे, राजू राठोड यांनी साहेबांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी पोलीस प्रशासन विभागाने विशेष सहकार्य केले तथा स्पंदन फाउंडेशन तर्फे आरोग्य सेवा देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र वानखेडे व प्रशांत गावंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व काँग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. यावेळी संग्रामपूर तालुक्यातील ग्राम वानखेड येथील युवकांनी डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला…
