पिंपळगाव काळे येथील पशु वैद्यकीय दवाखान्याला टाळा ठोको चा दिला इशारा वंचित बहुजन आघाडी

प्रतिनिधी जळगाव जामोद पिंपळगाव काळे येथील पशु वैद्यकीय दवाखान्याला टाळा ठोको चा दिला इशारा :- वंचित बहुजन आघाडी जळगांव जामोद :-दि.१५/१२/२०२३ रोजी पिंपळगांव काळे येथील पशु वैद्यकीय दवाखान्यातील रिक्त असलेले डॉक्टरांचे पद तात्काळ भरण्यात यावे अन्यथा पशु वैद्यकीय दवाखान्याच्या टाळा ठोको आंदोलन करण्यात येईल  असा इशारा पशु संवर्धन अधिकारी यांना निवेदनातून देण्यात आला यापूर्वी दि: १३/१२ ला पिंपळगांव सर्कल मधील पशु पालकांसह वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते यांनी दवाखान्यात औषध साथ उपलब्ध व्हावा व रिक्त असलेले पद भरण्यात यावे अश्या आशयाचे निवेदन दिले होते. त्या नंतर संबंधीचे अधिकाऱ्यांसोबत चर्चा होऊन औषध साठा उपलब्ध करण्यात येणार आहे व रिक्त असलेल्या जागेचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर तात्काळ पाठविला परंतु या मधील औषधसाठा हा दि १६/१२ पर्यंत उपलब्ध होणार आहे असे पशु संवर्धन अधिकारी डॉ तळोकर यांनी चर्चा करते वेळो सांगितले. तसेच तब्बल एक वर्षांपासून पिंपळगांव काळे पशु वैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नाहीत. पंचवीस हजार लोकसंख्येच्या गावात व दवाखान्या अंतर्गत येणाऱ्या बावीस गावाच्या पशुपालकांना त्यांच्या पशूंच्या आरोग्यांसंबंधी उपचार करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणून पिंपळगांव काळे येथील पशु दवाखाना आहे परंतु वर्षभरापासून या दवाखान्यात डॉक्टर, औषधे व लस व कर्मचारी या पैकी कोणती गोष्ट या दवाखान्यात उपलब्ध नसून पशुपालक व शेतकरी पशु संवर्धन विभागा बद्दल प्रचंड रोष व्यक्त करत आहे, दवाखान्याची प्रशस्त इमारत असून त्या मध्ये डॉक्टर नाहीत ही खूप मोठी शोकांतिका आहे. पशुंचे उपचार होत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे उपचारा अभावी पशु दगवत आहे काही जनावरे तर (FMD) लस नसल्यामुळे तडफडत आहे, अधिकाऱ्यांनी पशूंप्रति संवेदना ठेवावी. आपणांस विनंती आहे येत्या सात दिवसांत या अन्यथा येणाऱ्या दहा दिवसांत वंचित बहुजन आघाडी व पशुपालकांसह लोकशाही मार्गाने आंदोलन करून पशु वैद्यकीय दवाखाण्याला ला कुलूप लावण्यात येईल असा इशारा देण्यात आला.निवेदन देते वेळी वंचित चे युवा नेते प्रकाश भिसे, ता उपाध्यक्ष, सुनिल बोदडे, कृ.उ.ब.स संचालक प्रशांत अवसरमोल, गुलाबराव आठवले, ग्रा.पं. सदस्य संजय तायडे, संतोष पवार, आनंदा गवई आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *