आयुष्यभर धनगर समाजासाठी झटणार…

शेगाव तालुका प्रतिनिधी दिनांक- १ डिसेंबर २०२३ रोजी धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी समाजातील हजारो, महिला पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता, जय मल्हारच्या घोषणानी परिसर दणानून गेला होता.

यावेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना धनगर समाजबांधवाना सांगितले की मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांनी मला वाघ्यामुरळीच्या झोळीत टाकले होते, त्यामुळे मला समजते तेव्हापासून धनगर समाजाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत भविष्यात देखील सत्तेत असो वा नसो मात्र धनगर समाजाच्या भल्यासाठी तसेच उत्कर्षासाठी मी सातत्याने झटणार आहे, त्यांच्या विकासासाठी माझा सहभाग सदैव राहणार आहे. मी धनगर समाजाच्या विकासासाठी आयुष्यभर झटणार असल्याची ग्वाही यावेळी उपस्थित धनगर समाज बांधवांना दिली.

नंदू लवंगे हा मागील अनेक वर्षापासून माझ्याबरोबर खांद्याला-खांदा लावून धनगर समाजासाठी काम करत आहे, भविष्यातही मी त्याच्या पाठीशी उभा राहील तसेच धनगर समाजाचा एसटी प्रवर्गातील प्रमाणपत्र संदर्भात लवकरच वरिष्ठ पातळीवर मीटिंग घेऊन मागणी मांडणार आहे व केंद्र शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *