निवारा बालगृहाला आर्थिक मदतीचा हात

अकोला प्रतिनिधीबाळासाहेब नेरकर
अनाथ, निराधार, निराश्रीत, गरीब मुलांसाठी चालवण्यात येत असलेल्या निवारा बालगृहाला अकोला येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदतीचा हात देण्यात आला .अकोला येथील समाजसेविका कमलजीत कौर, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष दादाराव पाथीकर, निर्भय बनो जन आंदोलनचे संयोजक तथा समाजसेवक मराठायोद्धा गजानन हरणे , सामाजिक कार्यकर्ते किलबिल सुबी यांच्या हस्ते मोहा फाटा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथील निवारा बालगृहाचे पदाधिकारी रतन गोंडे पाटील, शेषराव जोशी,विकास कदम, यांच्याकडे ही मदत सोपवण्यात आली. या मदतीतून बालगृहाचा मुलांच्या जेवण, कपडे, शैक्षणिक साहित्य वर खर्च केला जाणार आहे. निराधाराची सेवा हीच ईश्वर सेवा समजून हे निवारा बालगृह निराधाराना आधार देण्याचे काम करीत असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आपला खारीचा वाटा त्यामध्ये उचलून त्यांना दिलासा देण्याचे काम केले आहेत. त्यांच्या या मदतीबद्दल सर्वत्र कौतुक केला जात असून ग्रामीण विकास केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी या मदतीबद्दल आभार व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *