प्रतिभा साहित्य संघाच्या अकोट तालुकाध्यक्षपदी विशाल कुलट तर सचिवपदी सागर तळोकार

  • अकोट प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडून. आकोट: १९९० मध्ये प्रतिभा साहित्य संघाच्या नावाने लावलेले साहित्याचे रोप आज महाराष्ट्रात नावारुपाला येऊन वटवृक्ष झाले आहे.दरवर्षी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन, करण्यात येते.पुरस्कार वितरण,पुस्तकांचे प्रकाशन,प्रतिभा संवाद,सांस्कृतिक कार्यक्रम,कविसंमेलनं इत्यादी सोबत नव्या लेखक व कविंना हक्काचं विचारपीठ उपलब्ध करून देण्याचे काम प्रतिभा साहित्य संघ सातत्याने करीत आहे. सध्याच्या युवक वर्गाला वाचन,लेखन व साहित्याची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्यातील अंधश्रद्धा दूर करून पुरोगामी विचार रुजवण्यासाठी अकोट तालुका अध्यक्षपदी युवा कवी विशाल कुलट यांची तर आदर्श शिक्षक सागर तळोकार यांची तालुका सचिवपदी नियुक्ती केली. अकोला जिल्हाध्यक्ष अरूण काकड,जिल्हा कार्याध्यक्ष शफाकत देशमुख यांनी प्रतिभा साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कुलट यांच्या मार्गदर्शनात नियुक्ती केल्याचे प्रसिद्धी पञकाद्वारे कळविले आहे. या नियुक्ती बद्दल दोघांचेही विजय सोसे,अरुण मोडक ,प्रकाश गायकी,गजानन मते, श्रीकृष्ण काकडे,तुळशीदास धांडे,महेंद्र कराळे,मंगेश वानखडे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *