बाळासाहेब नेरकर कडूनस्थानिक/ अकोला गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठान अकोला तर्फे सामाजिक दिवाळी उपक्रमात आरोग्य शिबिर ग्राम टिटवन येथे संपन्न. गाडगेबाबा प्रतिष्ठाण च्या वतीने दरवर्षी सामजिक दिवाळी साजरी करण्यात येते यावर्षी ग्राम टिटवा येथील आदिवासी भागात जाऊन तेथील बांधवा सोबत साजरी करण्यात आली सोबत आरोग्य शिबीर व दिवाळी फराळ व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यअध्यक्ष डॉ संजय तिडके,प्रमुख उपस्थिती म्हणून गावचे सरपंच श्रीमती अल्का बोपुलवार,श्री भूषण ताजने,श्री श्रीकांत माहुलकर,अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ लांजेवार, सौ मधुरिताई येडणे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.जिल्हा सामान्य रुग्णालयातिल आरोग्य विभातील कर्मचारी यांनी ग्राम टिटवन येथील जवळपास 200 चा वर नागरिकांची रक्ताच्या सर्व तपासन्या , महिला आरोग्य तपासणी,एच आय व्ही तपासणी,नेत्र व इत्यादी अनेक तपासणी,व मोफत ओषधी वाटप करण्यात आले. आरोग्य विभागातील व या संपूर्ण शिबिरात सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे मान्यवरांच्या हस्ते आभार पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करत मार्गदर्शक केले. अकोला येथील पारधी वस्तीत देखील फराळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक प्रतिष्ठाण चे अध्यक्ष रोहन बुंदेले,यांनी प्रास्तविक केले संचालन कु सुरभी दोडके यांनी केले तर आभार उपाध्यक्ष कु वैष्णवी आसेकर, यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतिष अस्वार,कु मयुरी बासोडे,अश्विनी शिंदे ,श्रद्धा डाबेराव, व टिटवन या गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी सहकार्य केले.

महाआरोग्य शिबीर व फराळाचे वाटप
