डीपी साठी संतप्त शेतकऱ्यांचे विद्युत वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

डीपी साठी संतप्त शेतकऱ्यांचे विद्युत वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी जळगाव जामोद

जळगांव (जा) :- पिंपळगाव काळे सर्कल मधील गेल्या एक महिन्यापासून एकूण दहा विद्युत रोहित्र (DP) जळालेल्या परंतु निष्क्रिय अधिकारी कर्मचारी यांच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना खुप मोठा फटका बसला आहे. शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला आहे म्हणून जळालेल्या DP तात्काळ लावा या करिता आज  म.रा.वि.वि.कं.मर्या वितरण केंद्र पिंपळगांव काळे कार्यालयात संतप्त शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी करून लेखी तक्रार देऊन कार्यालयात अनेकवेळा शेतकरी येजावं करत होते परंतु अधिकारी शेतकऱ्यांना जुमानत नसल्यामुळे थेट कार्यालयातच शेतकऱ्यांनी ठिय्या द्यायचा ठरवले होते. डीपी जळाल्यामुळे या तीस दिवसाच्या कालावधीत वीज अभावी पिकांना पाणी न मिळाल्याने पिकांवर रोगराई येत असून पाण्या अभावी पिके वाळत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे,  जोपर्यंत जाळलेले रोहित्र बसवत नाही व आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शेतकरी या कार्यालयातून उठणार नाही असा सर्व शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. पिंपळगांव काळे सर्कल मधील जळालेले विद्युत रोहित्र दुरुस्त करून देण्यात यावे किंवा नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी बांधव या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनात आंदोलन कर्ते युवा नेते प्रकाश भिसे, सामाजिक कार्यकर्ते, अनिल भोपडे, वासुदेव भोपळे, वासुदेव चोखंडे, शाळीग्राम भोपळे, गणेश इंगळे, संपत बुंदे,अशोक ताठे, भास्कर वाघमारे, पुरुषोत्तम भोपळे, मंगेश भोपळे, गणेश बोदडे, सरपंच रविंद्र जाधव किशोर भोपडे,वसंता बोदडे, झाल्टे, हरिदास पचपोर,विकास वाघ, स्वप्नील भोरे, भागवत झाल्टे, महेंद्र तायडे, साबीर देशमुख आदीं उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *