उधना–अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेसला नांदुरा स्थानकावर थांबा प्रवाशांच्या एकजुटीचे फलित; MH 56 प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश

उधना–अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेसला नांदुरा स्थानकावर थांबा प्रवाशांच्या एकजुटीचे फलित; MH 56 प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश

नांदुरा तालुका प्रतिनिधी (संदेश पहुरकर)

दि . २६/१०/२०२६ : नांदुरा रेल्वे स्थानकावर अधिकाधिक महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा आणि परिसरातील प्रवाशांना रेल्वे प्रवासाच्या सुधारित सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी MH 56 प्रवासी संघटनेच्या वतीने सातत्याने निवेदने देऊन रेल्वे प्रशासना कडे पाठपुरावा करण्यात येत आहे. या प्रयत्नांना यश मिळाले असून, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे व आमदार चैनसुखजी संचेती यांच्या प्रयत्नांतून उधना–अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेसला नांदुरा रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला आहे.या निर्णयाच्या स्वागतार्थ MH 56 प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेगाडीचे ढोल-ताशांच्या गजरात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी गाडीचे लोको पायलट व गार्ड यांचा सन्मान करण्यात आला.नांदुरा व परिसरातील प्रवाशांच्या सोयी साठी मिळालेला हा थांबा म्हणजे सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रवाशांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. लोकहिताच्या मागण्यां साठी संघटितपणे प्रयत्न केल्यास सकारात्मक परिणाम साधता येतात, हे या निर्णयातून अधोरेखित झाले आहे.या वेळी MH 56 प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव घनोकार, उपाध्यक्ष किशोरराव देशमुख, ZRUCC सदस्य स्वप्निलजी झांबड, अतिक अहमद सर, विजयजी डवंगे, जितेंद्र थावराणी, निमिष शर्मा, संजय नाईक आदी उपस्थित होते.नांदुरा रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास, अधिक एक्सप्रेस गाड्यांना थांबे आणि प्रवाशांच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता या साठी संघटनेचा पाठपुरावा या पुढेही सुरू राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.एकजूट प्रवाशांची… ध्येय विकासाचे… संकल्प नांदुराच्या प्रगतीचा!
MH 56 प्रवासी संघटना, नांदुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *